• Sat. Mar 14th, 2026

    बापरे बाप! ज्या माशांच्या प्रजातीला देशात बंदी ते 2.4 टन सापडले, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाकडून मोठी कारवाई

    बापरे बाप! ज्या माशांच्या प्रजातीला देशात बंदी ते 2.4 टन सापडले, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाकडून मोठी कारवाई

    महाराष्ट्रासह देशात ज्या माशांना बंदी आहे, अशा माशांच्या प्रजातीचे तब्बल 2.4 टन मासे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे उजनी जलाशयात अशा माशांच्या प्रजातींची बेकायदेशीर शेती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाकडून अतिशय महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे.

    प्रातिनिधिक फोटो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : राज्यासह देशभरात अनेकांना मासे खायला आवडतात. अनेकांना वेगवेगळ्या प्रजातींचे मासे खायला आवडतात. अनेकांना विविध प्रजातींच्या माशांची चव कशी असते ते ठावूक असते. खवय्यांची मागणी पाहता मत्स्यव्यवसायाला चालना देखील मिळते. मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात यशस्वी होतो. मत्स्य व्यवसायाला चालना मिळावी यासाठी सरकारकडून देखील महत्त्वाची पावलं उचलली जातात. तसेच राज्याच्या मत्सव्यवसाय विभागाकडून देखील विविध उपक्रम राबवले जातात. याशिवाय ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडतात, बेकायदेशीर गोष्टी घडतात त्या विरोधात देखील महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाकडून कारवाई केली जाते. आतादेखील अशीच मोठी कारवाई समोर आली आहे.

    उजनी जलाशयात बेकायदेशीरपणे मत्स्यव्यवसाय केला जात असल्याचा प्रकार राज्याच्या मत्सव्यवसाय विभागाच्या निदर्शनास आला आहे. या ठिकाणी बंदी असलेल्या आफ्रिकन कॅटफिशची शेती केली जात असल्याचं विभागाच्या लक्षात आलं आहे. तब्बल 2.4 आफ्रिकन कॅटफिश इथे आढळली आहे. या आफ्रिकन कॅटफिशवर देशात बंदी आहे. ही बंदी आतापासून नाही तर 1997 पासून आहे. कारण या आफ्रिकन कॅटफिशमुळे स्थानिक माशांच्या प्रजातींवर मोठं संकट येतं. त्यामुळे या माशांच्या प्रजातीवर बंदी आहे. असं असताना अशाप्रकारच्या माशांच्या प्रजातीची शेती काही मत्स्य व्यवसायिकांकडून केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    इंदापूरमधील कलठाण क्रमांक 2 येथे अशा प्रकारची मत्सत्य व्यवसाय शेती केली जात होती. विशेष म्हणजे अनेकवेळा याबाबत इशारा देवूनही आदेशाला न जुमानता अशाप्रकारे शेती केली जात होती. त्यामुळे या भागात राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली आहे. संबंधित बेकायदेशीर साठा हा बाजारात नेला जात होता. पण त्यांना अधिकाऱ्यांनी पकडलं.

    राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्त अर्चना शिंदे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी राठोड आणि अधिकारी तुषार वाळुंज, दीपाली गुंड आणि गजानन काटे यांनी या कारवाईत मौल्यवान भूमिका निभावली. या कारवाईला कारणही तसंच आहे. आफ्रिकन कॅटफिश ही प्रजाची स्थानिक माशांच्या प्रजातींसाठी धोकादायक आहे. तसेच पाणथळमधील जैवविधतेवरही त्याचा मोठा परिणाम पडू शकतो.

    याशिवाय आफ्रिकन कॅटफिश हे कमी ऑक्सिजन असलेल्या पाण्यातही जगू शकतात. तसेच ही वेगाने वाढणारी प्रजाती आहे. या माशांमुळे स्थानिक मासेमार व्यवसायिकांच्या उपजिवेकरही वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या माशांच्या प्रजातीची शेती करण्यास वारंवार बंद करण्याचं आवाहन केलं जात होतं. अखेर या प्रकरणी विभागाला कठोर कारवाई करावी लागली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा