• Sun. Jun 7th, 2026
    Badlapur Politics: एका मतासाठी तीन हजारांचे पाकीट? बदलापुरात राष्ट्रवादी-शिवसेना उमेदवार भिडले

    Badlapur Politics: बदलापूर नगरपालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी युती विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आहे. मतदान पाच दिवसांवर आल्याने अंतिम टप्प्यातील प्रचाराची धावपळ सुरू आहे.

    kulgaon badlapur municipality(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, बदलापूर: बदलापूर नगरपालिका निवडणुकीत उमेदवार प्रचाराचे मुद्दे विसरून गुद्द्यांवर येत असतानाच, गुरुवारी प्रभाग क्र.१मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडून मतदारांना तीन हजार रुपये रकमेची पाकिटे वाटली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला. काही महिला कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर, दोन्ही बाजूंच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची व धक्काबुक्की झाली. रोकड आणि इतर साहित्य ताब्यात घेऊन, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

    गुरुवारी प्रभाग क्रमांक १मध्ये राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसेवाटप होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उमेदवार तुकाराम म्हात्रे यांनी केला. विरोधी पक्षांच्या हालचालींवर पाळत ठेवत असताना आमच्या शाखाप्रमुखालासुद्धा पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला.
    Maharashtra Timesअंबरनाथमध्ये पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ विरुद्ध ‘ऑपरेशन धनुष्यबाण’, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही महायुतीत कुरघोडी थांबेना
    प्रभाकर पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. शिवसेनेकडून प्रभागात जाणीवपूर्वक तणाव निर्माण केला जात आहे. माझ्या उमेदवारीमुळे काहींची घाबरगुंडी उडाल्याने खोटे आरोप केल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान, प्रभागातून रोख रक्कम आणि इतर साहित्य ताब्यात घेतले असून पंचनामा सुरू आहे. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,’ असे बदलापूरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितले.
    Maharashtra TimesThane News : लोकल प्रवाशांसाठी दोन्ही शिवसेना एकत्र, ठाणे-मुलुंड दरम्यान स्टेशन, नवीन पादचारी पुलासाठी…
    पक्ष सोडणाऱ्याविरोधात मनसे मवाळ
    तीनपैकी एकाच प्रभागात उमेदवार

    अंबरनाथ: शहरातील मनसेच्या शहराध्यक्षांसह दोन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने, या तिघांनाही महापालिका निवडणुकीत पराभूत करण्याचा इशारा स्थानिक मनसैनिकांनी दिला होता. मात्र, या तीनपैकी केवळ एकाच प्रभागात मनसेने अधिकृत उमेदवार दिल्याने पक्षाची भूमिका मवाळ झाल्याची चर्चा आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा