Bhaskar Jadhav : रमेश कदम यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर पाठिंबा दिल्यामुळे थेट मातोश्रीवरुन भास्कर जाधव यांना समज देण्यात आल्याचे वृत्त आहे.
नेमकं काय घडलं?
विनायक राऊत यांनी ठाकरे गटाचे नगरसेवक राजू देवळीकर यांच्यासह 24 उमेदवार चिपळूण नगरपरिषदेत उभे केले आहेत. मात्र विनायक राऊत व भास्कर जाधव या दोन्ही नेत्यांमधील वाद ऐन निवडणुकीतच चव्हाट्यावर आले आहेत. भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कदम यांना पाठिंबा जाहीर केला असतानाच विनायक राऊत यांनी मात्र चिपळूण येथे येऊन आमची महाविकास आघाडी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर भास्कर जाधव यांची नाराजी असल्याचं स्पष्ट झालं. त्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीजवळ बोलताना मला एका निर्णयापर्यंत यावं लागेल असे बेधडक विधान केलं होतं.
Maharashtra Politics : ठाकरेसेनेच्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
‘मातोश्री’वरुन भास्कर जाधव यांना समज
यानंतर भास्कर जाधव यांनी रमेश कदम यांचा जाहीरपणे सभा घेत प्रचार सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर थेट मातोश्रीवरून भास्कर जाधव यांना संपर्क साधण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. पक्षाला नुकसान होईल असं कोणतंही पाऊल उचलू नका, असा सल्ला भास्कर जाधव यांना देण्यात आला आहे.
Nashik News : सुपारीसोबतच प्रचाराचा नारळही फुटला! महायुतीकडून तिकीट, मतदानाच्या दिवशीच लग्नाचा मुहूर्त, नवरदेव ‘उमेदवार’ म्हणतो…
मात्र आता या आदेशानंतर आता ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव कोणता निर्णय घेतात हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकीतच जिल्ह्यात ठाकरे गटात या दोन मोठ्या नेत्यांमधील वाद समोर आले आहेत
