Akola Abhishek Manorkar : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराला अकोल्यातून मोठं योगदान मिळालं आहे. अकोल्याचा अभिषेक मानोरकर याने आपल्या तांत्रिक कौशल्यातून नेत्रदिपक 3D ॲनिमेशन शो साकारला. अयोध्येतील श्रीराम मंदिरात त्याचं अद्भूत दर्शन होत आहे.
अभिषेकला कशी मिळाली ही संधी?
अभिषेक मानोरकर हा तरुण मुंबईतील एका ॲनिमेशन कंपनीत काम करतो. सर्कल क्रीएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि आयविझ डिजिटल सोल्युशन्स या कंपनीला हे काम मिळाल्यानंतर अभिषेकला विचारणा करण्यात आली. मिळालेल्या संधीचं सोन करत अभिषेकने लगेच होकार देत कामाला सुरुवात केली. चार दिवसात प्रोजेक्ट् पूर्ण करण्याच आवाहन अभिषेकपुढे होतं. पण रात्र-दिवस एक करत अभिषेकने काम पूर्णत्वास नेलं, आणि आज देशभरात त्याचं कौतुक केलं जात आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रोजेक्ट अकोल्यातच तयार करण्यात आला, आणि अकोल्यातूनच अभिषेकने याचा डेमो सुद्धा दिला.
अल्पवयीन मुलीला बाईकवर बसवून घरी नेलं, दरवाजाची कडी लावली, मुलीला कळताच बाहेर पळाली, अन्…; रायगडमध्ये खळबळ
काय काय आहे लेझर शोमध्ये?
या लेझर शोमध्ये मोर पंख, सुवर्ण रंगात दिसणार मंदिर, फुलांचं डेकोरेशन, कमळाची फुल आणि शेवटी दिवाळीसारखे सर्वत्र दिवेच दिवे दाखवण्यात आले. हे नयनरम्य दृश्य भाविकांना भावविभोर करत आहेत.
अभिषेकचं मानोरकरचं शिक्षण?
अभिषेक याने बी.कॉम पर्यंत शिक्षण पूर्ण करून ॲनिमेशनचा डिप्लोमा पूर्ण केलाय. गेल्या 15 वर्षापासून अभिषेक या क्षेत्रात काम करतोय, आणि त्याचा 15 वर्षांचा हा अनुभव आज संपूर्ण देशाला दिसतोय.
Nirmala Gavit Accident : नातवाला फिरवत असताना अनर्थ, मागून येणाऱ्या कारनं उडवलं; माजी आमदार निर्मला गावितांचा भीषण अपघात; CCTV समोर
तंत्रज्ञानातून अद्वितीय आणि प्रभावीरुप
श्रीराम मंदिरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे अकोलेकर कलावंत अभिषेक मानोरकर यांचा नीलेश देव मित्र मंडळाच्यावतीने सन्मान करण्यात आला. अभिषेक मानोरकर याने मंदिराची भव्यता, रामायणातील प्रेरणादायी प्रसंग, तसेच भारतीय संस्कृतीचे तेज यांना आधुनिक तंत्रज्ञानातून अद्वितीय आणि प्रभावीरुप दिलं आहे.
