• Wed. Jun 10th, 2026
    पार्थ-सुनेत्रा पवारांना मला राज्यसभेवर पाठवायचं होतं, पण मी अट नाकारली, नवनीत राणांचा खुलासा

    Rajya Sabha Election : मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी भाजपची प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ती असल्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अट मी नाकारली, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, अमरावती : राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी आपल्याला राज्यसभेवर पाठवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ही उमेदवारी स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट घालण्यात आली होती. ही अट आपल्याला मान्य नव्हती, असा खळबळजनक खुलासा भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी केला आहे

    राष्ट्रवादी प्रवेशाची अट नाकारली

    नवनीत राणा यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट शेअर करत या सर्व घडामोडींवर प्रथमच जाहीर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून राष्ट्रवादीने मला संधी देण्याचा विचार केला, याबद्दल मी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची ऋणी आहे. परंतु, केवळ पदासाठी मी माझी विचारधारा बदलू शकत नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी भाजपची प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अट मी नाकारली.

    फडणवीसांच्या सुचनेवरुन सुनेत्रा पवारांची भेट

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून आपण स्वत: सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती, अशी माहितीही त्यांनी दिली. राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा भाजपला सोडण्याबाबत विनंती करण्यात आली होती, मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ते शक्य होऊ शकले नाही, असे राणा यांनी सांगितले.
    Maharashtra TimesVijay Chavan : अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाचखोरी प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदारालाच अटक, नेमकं प्रकरण काय?
    दरम्यान, नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊनही चर्चा केली होती. नवनीत राणा यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची ही दुसरी वेळ हुकली असली, तरी त्यांनी आपण भाजपचे कार्य प्रामाणिकपणे करत राहणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

    ‘मला राज्यसभेवर पाठवण्याची सुनेत्रा पवारांची इच्छा…’; Navneet Rana यांचा मोठा खुलासा

    ‘हिंदुत्ववादी नेत्या भाजप सोडणे अशक्य’

    माजी खासदार नवनीत राणा या भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यसभेवर जाण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांमध्ये काहीही तथ्य नसून नवनीत राणा या भाजपच्या खंद्या कार्यकर्त्या आणि स्टार प्रचारक आहेत. त्या भाजप सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा ठाम विश्वास राज्याचे महसूल व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपच्या एका बैठकीसाठी बावनकुळे सोमवारी अमरावतीत आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राणा यांच्या पक्षबदलाच्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या.
    Maharashtra TimesHimanshu Jangra : 370 ची बिर्याणी चांगलीच ‘महागात’ पडली, प्रणित मोरेच्या शोमधील प्रेक्षकाला नोकरीवरुन काढलं, बॉसची व्हिडिओतून माहिती
    बावनकुळे म्हणाले, नवनीत राणा या राष्ट्रीय स्तरावरील नेत्या असून पक्षात त्यांचा मोठा सन्मान आहे. ‘हिंदू शेरणी’ म्हणून त्यांची ओळख आहे. प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या असलेल्या राणा नेहमीच ‘जय श्रीराम’चा जयघोष आणि ‘हनुमान चालीसा’चे पठन करतात, हेच त्यांचे दैवत आहे. त्यामुळे अशा प्रखर हिंदुत्ववादी नेत्या भाजप सोडून जाणे अशक्य आहे, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा