• Mon. Sep 14th, 2026
Maharashtra Live News 10th June 2026 : दिवसभरातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Jalgaon Accident : एका डुलकीने सहा जणांचा जीव गेला! कारचालक झोपेत होता, बस चालकाने सांगितला जळगाव अपघाताचा थरार

गुजरातहून साखरपुड्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांच्या कारचा आज सकाळी भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अन्य एक जण जखमी आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती आता समोर आली आहे. कारचालकाला डुलकी लागल्याने हा भीषण अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र अनेक जण नियमांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशाच निष्काळजीपणामुळे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ आज सकाळी कार, दुचाकी आणि बस यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed