Anand Nagar-Saket Elevated Corridor: ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी MMRDA ने आनंदनगर ते साकेत दरम्यान 8.24 किमी लांबीचा सहा-लेनचा उड्डाणपूल उभारणार आहे.
सध्या ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील तीन हात नाका, नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन आणि माजीवाड्यातील गोल्डन डायज जंक्शन येथे कायमस्वरूपी वाहतूक कोंडी होत असते. प्रतीक्षाकाळ वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन आणि माजीवाडा येथे सहा-लेनचे उड्डाणपूल असले तरी, तिथे ये-जा करणारी वाहतूक आणि विविध सर्व्हिस रोड्स व स्लिप रोड मुख्य रस्त्यात मिसळतात.
तीन नवे उड्डाणपुल, विमानतळाला थेट जोडणी; ठाणे-बेलापूर मार्गाचा होणार कायापालट, पाहा कुठून कुठे जोडणार
उन्नत मार्गाने सुटणार वाहतूक कोंडी
या कोंडीपासून दिलासा देण्यासाठी 8.24 किमीचा उन्नत मार्ग (elevated corridor) उभारण्याचा प्रस्ताव आखण्यात आला आहे. विशेषत: माजीवाडा जंक्शन मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा महत्त्वाचा दुवा असल्याने, हा पूल ठाण्यातील स्थानिक वाहतुकीसह मुंबई–नाशिक ते गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचीही कोंडी मोठ्या प्रमाणात कमी करेल.
हा एलिवेटेड कॉरिडोर आनंदनगर येथे चेडानगर-आनंदनगर उड्डाणपुलाच्या लँडिंगपासून सुरू होईल आणि ठाण्यातील सर्व गजबजलेल्या चौकांवरून जात साकेत, ठाणे (पश्चिम) येथे उतरेल. हा उन्नत मार्ग सहा लेनचा असेल आणि दोन्ही दिशेने वाहतूक कोंडी सोडवण्याचे उद्देश्य आहे . प्रत्येक बाजूस तीन लेन असतील. रस्त्याची एकूण लांबी 8.24 किमी इतकी असणार आहे. त्याचबरोबर प्रकल्पाचा एकूण खर्च 1,847.72 कोटी रुपये इतका असणार आहे.
शिवसेना व रिपब्लिकन सेनेची युती, एकनाथ शिंदेंना मिळाली आनंदराज आंबेडकरांची साथ
कधी होणार काम पूर्ण?
आता या मार्गाचे काम सुरू झाले असून, सध्या पाइल, पिअर आणि पाइल कॅपचे काम सुरू आहे. 48 महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यापैकी 36 महिने प्रत्यक्ष बांधकामासाठी ठेवण्यात आले आहेत. हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
