Dhule Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
शिरपूर-जळोद रस्त्यालगतच्या भामपूर शेती शिवारात वीटभट्टीजवळ घडलेल्या या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिरपूर तालुक्यातील सातपूर येथील अल्पवयीन पीडित मुलगा अचानक गायब झाल्यानंतर कुटुंबियांनी त्याची सगळीकडे शोधाशोध केली. त्यानंतर समोर आलेल्या माहितीने सर्वांना मोठा धक्का बसला.
Raigad Crime : डोक्यापासून छातीपर्यंत जखमा, रक्ताने माखलेल्या लाकडी पट्ट्या; हिराबाई जोशी मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा
हिमांशूच्या वडिलांनी दिली फिर्याद
शिरपूर तालुक्यातील भामपूर येथील चिंतामण उर्फ चिंतू साहेबराव कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी यांनी हिमांशू यास जबरदस्तीने गाडीवर बसवून त्याचं अपहरण केलं. यानंतर त्याला शिरपूर-जळोद रस्त्यावरून शेतातील वीटभट्टी परिसरात नेण्यात आलं. तेथे त्याला मारहाण करून एका लोखंडी बैलगाडीला बांधण्यात आलं. या क्रूरतेनंतर दोन्ही संशयितांनी बैलगाडीच्या खाली जाळ केला. गाडीखाली लावण्यात आलेल्या आगीमुळे लोखंडी पत्रा तापला आणि हिमांशू गंभीररित्या भाजला आहे.
Nanded Crime : भरगच्च पगार, साडे पाच हजार रुपयांसाठी लाज सोडली; लाच घेताना महिला नायब तहसीलदारास अटक
‘ट्रॅक्टरचे लाईट माझ्याकडे आहेत, मी आणून देतो’
हिमांशूने ‘ट्रॅक्टरचे लाईट माझ्याकडे आहेत, मी आणून देतो’, असं खोटं सांगत गयावया केली, आणि दोघांच्या ताब्यातून स्वतःची सुटका करून घेतली. घरी परतल्यावर आईला त्याने संपूर्ण घटना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला’, अशी माहिती त्याचे मामा महेश पवार यांनी दिली. अल्पवयीन मुलांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरपूर शहर पोलिसांनी चिंतामण उर्फ चिंटू भाऊसाहेब कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दोघांविरुद्ध अपहरण, मारहाण आणि हिमांशू याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांसह बालसंरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल करणार आहेत.
