Nandurbar Accident : नंदुरबारमध्ये एक हृदयद्रावक घटना घडलीय. एका भीषण अपघात झालाय. एका दुचाकीची गायीला धडक दिल्यानं एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अचानक गाय रस्त्यात आडवी…
नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथे राहणारे श्रावण भगवान चित्रकथे (वय 65) यांच्या सासूचं निधन झाल्यानं त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचा मामाचा मुलगा शाम धर्मा चित्रकथे यांच्यासोबत दुचाकीनं मध्यप्रदेश राज्यातील पानसेमल गेले होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर श्रावण भगवान चित्रकथे पानसेमल येथून चौपाळे गावाकडे परत येत असताना शाम धर्मा चित्रकथे दुचाकी (क्र.एमएच 39 एम 2350) चालवत होते. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ अचानक गाय रस्त्यात आडवी आली. दुचाकीने गायीला धडक दिली. त्यामुळे दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने श्रावण भगवान चित्रकथे यांचा जागीच मृत्यू झाला.
Amravati Crime : सू करायला थांब, मग मी येतो आणि… विवाहिता मिस्त्रीच्या नादाला लागली, नवऱ्याला जंगलात नेलं अन्… महाराष्ट्रातील घटना
तसेच दुचाकीस्वार शाम धर्मा चित्रकथे हे जखमी झाले आहे. अपघातात दुचाकीचे नुकसान झालं. या प्रकरणी सुकलाल भगवान चित्रकथे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात शाम धर्मा चित्रकथे रा. चौपाळे ता. नंदुरबार याच्याविरुद्ध भा.न्या.सं.चे कलम 106 (1), 281, 125 (अ) (ब) सह मोटरवाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हेकॉ. मेहरसिंग वळवी करीत आहेत.
मोठी बातमी: पुणे फॉर्च्युनर हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडले; दोन नव्हे चार जण कटात सहभागी, कारणही झालं स्पष्ट
56 जणांना घेऊन जाणारी स्कुल बस 150 फूट खोल दरीत कोसळली
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला होता. आश्रम शाळेला सुट्टी लागल्याने गावाकडे आलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असलेल्या खाजगी बस मोलगी अक्कलकुवा दरम्यान असलेल्या आमलीबारी जवळ घाटातील दरीत 150 फूट कोसळून भीषण अपघात घडला. या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर 18 जण जखमी आहेत. पैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या बसमध्ये 56 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

