Ahilyanagar Brother Sister Drowned in Water : अहिल्यानगरमधील कोपरगाव तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मेंढ्या धुवायला गेलेल्या सख्ख्या भाऊ-बहिणीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आईसोबत मेंढ्या धुण्यासाठी
प्राथमिक माहितीनुसार, सार्थक बढे आणि सुरेखा बढे हे सख्खे भाऊ-बहीण आज शनिवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे शिवारात असलेल्या दगडाच्या खाणीतील साठलेल्या पाण्यात त्यांच्या आईसोबत मेंढ्या धुण्यासाठी गेले होते. आई कपडे धुवत असताना भाऊ आणि बहीण खाणीच्या पाण्यात मेंढ्या धुवत होते. दुर्दैवाने, मेंढ्या धुत असताना हे दोघे भाऊ-बहीण खाणीतील खोल पाण्यात पडले. आईने ही गोष्ट पाहताच आरडाओरडा करून स्थानिक नागरिकांना मदतीसाठी बोलावले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता आणि हे दोघेही भाऊ-बहीण पाण्यात बुडून मयत झाले होते. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवले.
दिसायला हिरोपेक्षा कमी नाही, इन्स्टाला 10 लाख फॉलोअर्स, पठ्ठ्यानं घरी EDची धाड पडल्याचं सांगून गर्लफ्रेंडला फसवलं, फेमस रीलस्टारला…
भाऊ-बहिणीचं अकाली निधन
सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्या भाऊ-बहिणीचे मृतदेह पाण्याबाहेर काढले व पंचनामा केला. रुग्णवाहिकेमधून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. सख्या भाऊ-बहिणीच्या या अकाली निधनाने डाऊच खुर्द आणि चांदेकसारे परिसरात शोककळा पसरली आहे.
Kolhapur Crime : लग्नाला नकार देणं ठरलं जीवघेणं, मुलीच्या वडिलांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण, घरी गेले अन्…; कोल्हापूर हादरलं
30 वर्षीय तरुण सर्वांसमोर होरपळून मृत्युमुखी
आपल्या बहिणीला आणण्यासाठी कार घेऊन नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथून कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाटा येथे निघालेल्या तरुणाचा कार आणि खासगी बसच्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अहिल्यानगरमधील कोपरगाव तालुक्यातील नगर–मनमाड महामार्गावर भास्कर वस्ती जवळ 14 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला.

