Chhatrapati sambhajinagar politics: छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १६ नोव्हेंबर रोजी हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस 16 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरचा दौऱ्यावर आहेत. तिथे ते भारतीय जनता पार्टीच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. याच कार्यक्रमात राजू शिंदे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत.
Jalgaon Politics: शिंदे गटाच्या कार्यालयात भूत? त्यामुळे मनपाच्या जागेत थाटलं नवं कार्यालय? नेमकं प्रकरण तरी काय? होतेय कारवाईची मागणी
राजू शिंदे यांनी 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. स्वतः उद्धव ठाकरेंनी या पक्षप्रवेशाला उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांना उद्धव ठाकरेंनी संभाजीनगर पश्चिमची उमेदवारीही दिली होती. यावेळी राजू शिंदे यांनी संजय शिससाठ यांच्याविरुद्ध लाखांच्यावर मतदानही मिळवलं होतं. दरम्यान, पराभवानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकात खैरै यांच्यावर प्रतिस्पर्धी उमेदवाराला मदत केल्याचा खळबळजनक दावा केला होता. यावरुनच नाराज असल्याने त्यांनी पक्षाला रामरामही केला होता.
दरम्यान, गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी राजू शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत केलेल्या प्रवेशामुळे भाजप व शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला होता. त्याचा परिणाम मतांच्या टक्केवारीवरही दिसून आल्याचे पाहायला मिळाले होते. राजू शिंदे यांनी ठाकरे गटात जाऊ नये यासाठी भाजपने विविध प्रयत्न केले होते. तेव्हाचे केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे यांनीही मध्यस्थी केली होती, पण त्यानंतरही त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.
दरम्यान, राजू शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरण बदलणार आहे. भाजप व महायुतीला मोठी ताकद या प्रवेशामुळे मिळणार आहे.

