Ajit Pawar on Parth Pawar Land Scam : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात स्पष्टीकरण दिलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
‘संपूर्ण प्रकरणाची नीट चौकशी होईल. कारण, पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊन, सरकारची पण फसवणूक व्हायला नको. जे व्यवहार करताच येत नाही, ज्याच्या नोंदीच होऊ शकत नाहीत. ते करण्याचं पण धाडस काहींनी दाखवलं आहे. ते कशामुळे दाखवलं, त्याच्यामध्ये कुणी फोन केलाय का? कुणी दबाव आणलाय का? त्यापद्धतीने सर्व तपास करायला सांगितला आहे, आणि त्याबद्दलचे आदेशही काढण्यात आलेले आहेत. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आपल्याला वस्तूस्थिती कळेल’, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
अखेर ठरलं..! महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र लढणार, कुणाला किती जागा मिळणार?
‘जो कागद होण्याचं कारण नाही, ज्याच्यात एक रुपयाही दिला गेलेला नाही, आणि तो कागद होऊ शकत नाही. अशा गोष्टी असूनही तो केला गेलेला आहे. जो कागद केला होता, त्याला ग्राह्य धरलं गेलं होतं तर त्याला आता रद्द करण्यात आलेलं आहे. हे झाल्यानंतर कुठल्या विभागानं काय कळवायचं ते कळवलेलं आहे. माझी एवढीच विनंती आहे की, जे खरं असेल तेच दाखवा, परंतु जे खरं नसेल तर त्याची बदनामी करु नका’, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या घरी मुंबई पोलिसांची नोटीस धडकली, मुंडेंसोबत वाद असताना चौकशीसाठी मुंबईत बोलावलं; प्रकरण काय?
नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर सरकारी जमीन अत्यंत कमी किमतीत खरेदी केल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या व्यवहारात तब्बल 25 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली असून, केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार पूर्ण झाला आहे. व्यवहारानंतर अवघ्या दोन दिवसांत स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं या प्रकरणाची फाईल इतक्या वेगाने कशी फिरली, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे.

