• Tue. Sep 22nd, 2026
Sunetra Pawar : खपवून घेणार नाही, काँग्रेसने माफी मागावी, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे संतापले

काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे संतापले आहेत. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल वापरलेली अशी भाषा खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका दोन्ही दिग्गज नेत्यांनी घेतली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवरुन करण्यात आलेल्या टीकेवर संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसने माफी मागावी अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी घेतली आहे.

सुनील तटकरे काय म्हणाले?

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या अधिकृत एक्स खात्यावरून करण्यात आलेली पोस्ट ही त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे जाहीर प्रदर्शन आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात मतभेद असू शकतात, राजकीय संघर्षही असू शकतो; परंतु महिलांचा अवमान करणारी, वैयक्तिक पातळीवर घसरलेली भाषा कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही, असं परखड मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं आहे.

राजकारणात विचारांचा मुकाबला विचारांनी व्हावा, मुद्द्यांना मुद्द्यांनी उत्तर द्यावे. परंतु जेव्हा एखादा पक्ष महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरतो, तेव्हा तो आपल्या संस्कारांचा आणि राजकीय संस्कृतीचा खरा चेहरा जनतेसमोर आणतो. महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही सुसंस्कृत संवादाची आहे, व्यक्तीचा अपमान करण्याची नाही, असं सुनील तटकरे यांनी सुनावलं आहे.
Maharashtra TimesHarshwardhan Sapkal : सुनेत्रा पवार यांच्यावर बोचरी टीका, महाराष्ट्राच्या राजकारणात वादाची मोठी ठिणगी, हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले?
काँग्रेसने या पोस्टबद्दल महाराष्ट्रातील महिलांची आणि सुनेत्रावहिनी पवार यांची जाहीर माफी मागावी. मतभेद लोकशाहीचा भाग आहेत; मात्र महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सुनील तटकरे यांनी दिला आहे.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटवरून करण्यात आलेल्या अपमानास्पद भाषेचा आम्ही तीव्र निषेध करतो. शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अवमान कधीही स्वीकारला जाणार नाही.”

“ज्या पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांसारख्या महिला नेत्या करत आहेत, त्याच पक्षाकडून एका महिला नेत्याविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.”
Maharashtra TimesSunetra Pawar : ‘तुमच्या सुनेला काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष एवढं घाणेरडं बोलत आहे’, संजय काकडे यांचं शरद पवारांना आवाहन
“काँग्रेसने संबंधित पोस्ट तात्काळ मागे घेऊन जाहीर दिलगिरी व्यक्त करावी. महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही.”

नवाब मलिक काय म्हणाले?

“महिलांचा सन्मान हा राजकारणापलीकडचा विषय आहे. एका महिला नेत्याविरुद्ध “गुंगी गुडिया”सारखी अवमानकारक भाषा वापरणे म्हणजे प्रत्येक महिलेचा अपमान आहे. मतभेद असू शकतात, पण महिलांचा अवमान कधीच मान्य होणार नाही. महाराष्ट्र काँग्रेसने याबद्दल माफी मागावी.”