लातूरमध्ये अतिशय धक्कादायक आणि संतापजनक अशी घटना समोर आली आहे. 50 वर्षीय नराधमाने 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर : राज्यात महिला आणि मुली खरंच सुरक्षित आहेत ना? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण अल्पवयीन मुली, महिलांवर अत्याचाराच्या घटना दररोज वाढताना दिसत आहेत. लातूरमध्ये तर डोकं सुन्न करणारी घटना समोर आली आहे. लातूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. एक लहान मुलगी मेडिकल स्टोअरमध्ये औषध आणण्यासाठी गेली असता, त्या मुलीवर मेडिकल स्टोअरच्या कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेनं लातूर शहर हादरून गेलं आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील एका गावातील एक 9 वर्षे वयाची बालिका गावातीलच एका मेडिकल दुकानात औषधाची गोळी आणण्यासाठी गेली असता एका इसमाने दुकानाच्या वरच्या मजल्यावर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अतिप्रसंग केला. या घटनेमुळे गाव आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गावातील अल्पवयीन पीडित मुलगी आरोपीच्या मेडिकल दुकानात गोळी आणण्यासाठी गेली होती. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही मुलगी दुकानात गेल्यानंतर दुकानदार आणि दुकानातील नोकर याने काहीतरी निमित्त करून दुकानाच्या वर तिला नेले. तिच्यावर जबरदस्तीने अतिप्रसंग केला. नंतर ही बाब कोणाला सांगू नको म्हणून त्याने तिला 30 रूपयेही दिले, असे सांगण्यात येते. मात्र, ती मुलगी घरी गेल्यानंतर तिने आईला ही घटना सांगितली. तेव्हा आईने याबाबत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात तात्काळ धाव घेतली. ही घटना २ नोव्हेंबर रोजी घडलेली होती. शिरूरअनंतपाळ पोलिसांत या प्रकरणी वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याचे वृत्त आहे.
एका अल्पवयीन बालिकेवर किळसवाणा असा हा अतिप्रसंग करण्यात आला. याबाबत आपण त्या बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे अपेक्षा व्यक्त करीत आहोत. वैद्यकीय चाचणी रिपोर्ट अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करून घेतला आहे. लवकरच हे रिपोर्ट मिळतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा