Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 च्या भुयारी मार्गावर प्रवाशांना मोबाइल नेटवर्कची समस्या भेडसावत आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेलने सेवा बंद केल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
देशातील सर्वाधिक लांबीची मेट्रो 3(ॲक्वा मार्गिका) ही आरे जेव्हीएलआर-बीकेसी-कफ परेड या 27 स्थानकांदरम्यान तीन टप्प्यांत सुरू झाली आहे. एक स्थानक वगळता ही मार्गिका पूर्णपणे भुयारी असल्याने ती जमिनीपासून सरासरी 18 मीटर खोलीवरून धावते. परिणामी, त्यात मोबाइल नेटवर्कचा अडथळा सुरुवातीपासून आहे. त्यावर मात करण्यासाठी एमएमआरसीएलने सौदी अरेबियाच्या ‘एसेस इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीशी मोबाइल नेटवर्क सुविधा उभारणीचा कंत्राटी तत्त्वाववरील करार केला आहे. कंपनीने संपूर्ण मार्गादरम्यान मोबाइलसाठी नेटवर्क उभे केले आहे. मात्र त्यानंतरही प्रवाशांना नेटवर्क मिळत नाही.
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज पासून BESTच्या बसमार्गांमध्ये होणार मोठे बदल; पाहा कुठे होणार परिणाम?
शेवटचा पर्याय ‘बीएसएनएल’
एमएमआरसीएलमधील सूत्रांनुसार, रिलायन्स जिओने एसेस इन्फ्राचे जाळे वापरून त्याआधारे नेटवर्क देण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच त्यांचे नेटवर्क संपूर्ण मार्गिकेभर कुठेही नाही. एअरटेलनेही काढता पाय घेतला आहे. तर ‘वि’ म्हणजेच व्होडाफोन-आयडीया नेटवर्कची सुविधा मर्यादित आहे. बीएसएनएलशी बोलणी यशस्वी झाल्यास त्यांचे नेटवर्क मिळू शकेल.
एकूण 33 किमीच्या या मार्गिकेचा पहिला टप्पा आरे जेव्हीएलआर-बीकेसी असा ऑक्टोबर 2024मध्ये सुरू झाला. सुरुवातीला सर्व कंपन्यांचे नेटवर्क फलाटासह धावत्या गाडीतही मिळत होते. मात्र दोन महिन्यांतच दोन कंपन्यांनी काढता पाय घेतला. भुयारी मेट्रो 3चा टप्पा ‘2 अ’ म्हणजे धारावी ते आचार्य अत्रे चौक या सहा स्थानकांत ‘वि’चे नेटवर्क धावत्या गाडीतही उपलब्ध आहे. मात्र ‘विज्ञान केंद्र ते कफ परेड’ या 11 स्थानकांच्या अंतिम टप्प्यात कुठल्याही कंपनीचे नेटवर्क कुठेही उपलब्ध नाही.
राज ठाकरेंनी पत्रकारांना कसं चकवलं? भरसभेत अॅक्शन करून दाखवली
‘वाय-फाय’ तिकिटापुरते
या मार्गिकेची सर्व स्थानके जमिनीपासून किमान तीन मजले खाली आहेत. तर, तिकीटखिडकीही दोन मजले खाली आहे. एकीकडे डिजिटल एमएमआरसीएल तिकिटांचा आग्रह धरीत असून हे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांसमोर दहा अॅप उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र नेटवर्कच नसताना डिजिटल तिकीट काढणार कसे? यासाठी कंपनीने त्यांच्या ‘मेट्रोकनेक्टर’ या अॅपच्या माध्यमातून वाय-फाय सुविधा दिली आहे. परंतु ही सुविधाही फक्त तिकीट खिडकी परिसरापुरती आहे. तेथील जेमतेम 10 परिघात मीटरच्या ‘वाय-फाय’ असून अन्यत्र कुठेही (ना फलाटावर, ना अन्य भागांत व ना धावत्या गाडीत) ही सुविधा व नेटवर्क उपलब्ध नाही.

