• Sat. Jul 11th, 2026

    नवरात्र उत्सवात नवीन वाहन नोंदणीमध्ये २४ टक्क्यांनी वाढ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 28, 2025
    नवरात्र उत्सवात नवीन वाहन नोंदणीमध्ये २४ टक्क्यांनी वाढ – महासंवाद




    मुंबई, दि. २८ : केंद्र शासनाकडून दिनांक २२ सप्टेंबर २०२५ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) मध्ये केलेल्या बदलांमुळे यावर्षी नवरात्र उत्सवाच्या कालावधीत नवीन वाहन खरेदीस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. २२ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण १ लाख २५ हजार ३९९ नवीन वाहनांची नोंदणी झाली असून, हे मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या १,००,९१२ वाहनांच्या नोंदणीपेक्षा तब्बल २४ टक्क्यांनी अधिक आहे, असे परिवहन विभागाचे सह परिवहन आयुक्त (संगणक ) शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

    वाहन नोंदणीचा तपशील पुढीलप्रमाणे:

    दुचाकी वाहने: मागील वर्षी ६६,५८८, यावर्षी ७७,०६१

    मोटारकार: मागील वर्षी २१,६२०, यावर्षी ३२,९१२

    इतर वाहने (ऑटो, टॅक्सी, बस, ट्रक इ.): मागील वर्षी १२,७०४, यावर्षी १५,४२६

    000000

    मोहिनी राणे/स.सं

     







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed