• Sat. Jul 11th, 2026
    BEST Bus Accident: बेस्ट बसची ‘धडक’ मोहीम थांबेना! अंधेरीत 14 वाहनांना उडवले; दोन जण जखमी

    Mumbai BEST Bus Accident: ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, गेल्याच महिन्यात, १७ जून रोजी, या बसची पूर्ण तपासणी करण्यात आली होती. त्यात ब्रेक आणि क्लचच्या तपासणीचाही समावेश होता, असे सूत्रांनी सांगितले.

    मुंबई बस अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसच्या अपघातांचे सत्र सुरूच असून, शुक्रवारी त्यात आणखी एका घटनेची भर पडली. अंधेरी पश्चिमेकडील आंबोली येथे एका बसने १४ वाहनांना धडक दिली. या धडकेत दोन जण जखमी झाले. अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. बेस्टच्या बस अपघाताची गेल्या चार महिन्यांतील ही पाचवी घटना आहे.

    सांताक्रूझ आगाराची बस शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एस. व्ही. रोडवर उजवीकडे वळण घेत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने १४ वाहनांना धडक दिली.

    Maharashtra TimesSanjay Raut: संजय राऊतांची पवारांवर जाहीर नाराजी, विधिमंडळातील भेटीवरून कोंडीत पकडलं; शिंदे मदतीला धावले, खोचक शब्दांत पलटवार!
    अपघातामध्ये संतालाल यादव (३३) आणि साक्षी (३३) हे दोन जण जखमी झाले. त्यांना मिल्लत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनेत रिक्षाचालकांचे मोठे नुकसान झाले. काही रिक्षांचा तर चक्काचूर झाला. चारचाकी वाहनांचेही बरेच नुकसान झाले. या घटनेनंतर बेस्टच्या चालक आणि वाहकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. अपघातग्रस्त बस विनावातानुकूलित असून २०२२पासून भाडेतत्त्वावर सेवेत आहे. बसचे फिटनेस सर्टिफिकेट १७ फेब्रुवारी, २०२८ रोजीपर्यंतचे आहे.

    आधीच्या घटना

    -८ जुलै, २०२६ : भांडुप येथे बेस्टची बस मागे घेताना एका पादचाऱ्याला धडकली. त्यानंतर बसने पाच वाहनांना धडक दिली.
    -जून, २०२६ : दादर येथे प्लाझा सिनेमागृहाजवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, सहा जण जखमी झाले.
    -४ जून, २०२६ : मालाड पूर्व येथील पुष्पा पार्क परिसरात बेस्ट बसने उभ्या असलेल्या ओला कारला धडक दिली. त्यात कॅबचालक निराहू पाल यांचा मृत्यू झाला.
    -१४ मे, २०२६ : अंधेरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवर चार बस एकामागोमाग उभ्या असतानाच तिसरी बस मागेपुढे करण्याच्या प्रयत्नात सर्व बस एकमेकांना धडकल्या. त्यात बस वाहकाचा मृत्यू.
    -एप्रिल, २०२६ : भांडुप पश्चिम येथे एका बेस्ट बसचा हँडब्रेक न लागल्याने बस मागे येऊन अपघात झाला. जीवितहानी झाली नाही.
    -२९ डिसेंबर, २०२५ : भांडुप पश्चिमेला बस अपघातात चार ठार.
    -९ डिसेंबर, २०२५ : कुर्ला येथून अंधेरी बस स्थानकाकडे जाणाऱ्या बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. त्यात नऊ जण ठार, तर ४० जण जखमी झाले होते.
    Maharashtra TimesTukaram Mundhe FDA Department : ताटातील अन्नातही भेसळ! 4 हॉटेल्सचे परवाने जागेवर निलंबित, 13 जणांना उचललं, FDAची राज्यात कुठे-कुठे कारवाई?
    झाले काय ?
    सांताक्रूझ आगाराची मातेश्वरी कंपनीची भाडेतत्त्वावरील २४२ क्रमांकाची बस मिल्लत नगरहून अंधेरी बस स्थानकाकडे जात होती. अंधेरी सब-वेजवळ सीझर रोडवरून एस. व्ही. रोडवर उजवीकडे वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस १४ वाहनांना धडकली. त्यात नऊ रिक्षा, चार कार आणि एक टेम्पो यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत काही रिक्षांचा चक्काचूर झाला, तर काही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा