Maharashtra Rain Forecast El Nino : एल निनोच्या वर्षांमध्ये पावसाचे दिवस कमी असतात, परंतु तापमानवाढीमुळे पावसाचे स्वरूप बदलले आहे. एकूण पाऊसमानामध्ये मुंबई-पुणे या दोन्ही शहरांमध्ये सन २००० नंतर पावसाची सरासरी वाढली आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जुलैमध्ये वेगाने सक्रिय होत असलेल्या एल निनोच्या पार्श्वभूमीवर, कोकण विभागात पावसाने जुलै महिन्याच्या अवघ्या सात दिवसांमध्ये संपूर्ण जुलैची सरासरी ओलांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एल निनोचा स्वतंत्रपणे विचार न करता वातावरण बदलाच्या काळात समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढत्या तापमानाचाही विचार करणे आवश्यक असल्याचे दिसत आहे.
तापमानवाढीने पावसाच्या स्वरुपात बदल
एल निनोच्या वर्षांमध्ये पावसाचे दिवस कमी असतात. मात्र तापमानवाढीमुळे पावसाचे स्वरूप बदलले आहे. एकूण पाऊसमानामध्ये मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये सन २००० नंतर पावसाची सरासरी वाढली आहे. एल निनोमुळे एकीकडे पावसाचे आगमन, पावसाचे दिवस यांवर परिणाम होत असताना, दुसरीकडे वातावरण बदलामुळे पावसाच्या आकडेवारीवर परिणाम होत आहे. जुलैमध्ये मान्सून वारे सक्रिय होते, त्यावेळी विविध हवामान प्रणाली सक्रिय होत्या. यामुळे एल निनो असताना कोकणाला पावसाचा तडाखा बसल्याचे ‘स्कायमेट वेदर’ या खासगी हवामान संस्थेच्या हवामान अंदाज विभागाचे उपाध्यक्ष महेश पालवत यांनी सांगितले. 2029 मध्ये देशभरात एकाच वेळी निवडणूक? One Nation One Election ला जोर, अंतिम आराखड्यासाठी प्रयत्न
‘एल निनो’तही विसर्गाचा विक्रम
दरम्यान, ‘एल निनो’ च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण यंदा कमी असल्याने धरणे भरतील का, हा प्रश्न असताना जुलैच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यातील काही धरणे पूर्ण भरली आहेत. २०१७ पासून केवळ मागच्या वर्षीचा अपवाद वगळता यंदा खडकवासला धरणातून जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरणातून विसर्ग करण्यात आला आहे. आठ दिवसांतील पावसाने खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा विक्रमी १३ अब्ज घनफुटाने (टीएमसी) वाढला आहे. याविषयी चिंतामणी पत्की यांनी सविस्तर वृत्त दिले आहे.
टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. एक ते आठ जुलै या कालावधीत खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. खडकवासला धरण बुधवारी पहाटे शंभर टक्के भरले. त्यानंतर विसर्ग २७ हजार २०३ क्युसेक करण्यात आल्याने मुठा नदीला पूर आला होता. एक जुलै रोजी खडकवासला धरणात ०.३१, पानशेत धरणात १.८०, वरसगाव धरणात १.५६ आणि टेमघरमध्ये शून्य असा एकूण ३.६८ टीएमसी पाणीसाठा होता. शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत पाणीसाठा १६.५२ टीएमसी झाला.
देशात El Nino चा इशारा असतानाही Maharashtra मध्ये मुसळधार पाऊस कसा? काय म्हणाला शेतकरी?
‘टेमघर, वरसगाव आणि पानशेत या धरणांमधून खडकवासला धरणात पाण्याचा विसर्ग केला जातो. त्यानंतर खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडले जाते. खडकवासला धरणातून पाणी विसर्ग करण्याची क्षमता ९८ हजार ७६६ क्युसेक इतकी आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे जून महिना कोरडा गेल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरतील का, हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, मागील आठ दिवसांतील दमदार पावसामुळे पुणेकरांची किमान आठ महिन्यांची चिंता मिटली आहे,’ असे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. Bus hold for Shev Puri : इच्छा माझी ‘पुरी’ करा! बेस्ट चालकाने शेवपुरीसाठी बस रस्त्यात 20 मिनिटं थांबवली, मुलुंडमध्ये वाहतुकीचे तीनतेरा दरम्यान, शुक्रवारी सकाळी ऊन पडल्याने व पावसाने उघडीप दिल्याने शहरात पावसामुळे साचलेले पाणी ओसरले. दिवसभरात अधूनमधून वारे वाहत असल्यामुळे उकाड्यात मात्र वाढ झाली नव्हती.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा