PSI Gopal Badane Arrested : सातारा फलटणमधील मुख्य संशयित आरोपी गोपाल बदने याने पोलीस चौकीत आत्मसमर्पण केलं आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाल बदने दोन दिवसात पंढरपूरहून सोलापूरला गेला होता. मग बीडला घरी जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने काल रात्री उशीरा थेट पोलीस चौकीत हजेरी लावली. बदने सोलापुरातील काही पोलिसांच्या सोशल मीडियावरून संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे. बदनेच्या कुटूंबायांना त्याला हजर न झाल्यास नोकरीतून बडतर्फ करणार असल्याचं कळल्यानंतर बदने पोलीस चौकीत हजर झाला अशी माहिती आहे. यासंबंधीचं वृत्त एका वृत्तवाहिनीनं दिलं आहे.
Satara Crime: भावाने शिक्षण सोडलं, शेतकरी बापाने कर्ज घेत लेकीला डॉक्टर केलं; साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या मृत्यूने कुटुंब उद्ध्वस्त
अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडला
दरम्यान, एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, आत्मसमर्पण केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत पीएसआय बदने याने तोंड उघडलं. तो तपास अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडल्याची माहिती आहे. त्याने आपण महिला डॉक्टरवर कसल्याही प्रकारे अत्याचार केला नाही, असं पोलिसांना सांगितलं आहे. शिवाय त्याने इतरही काही गोष्टी पोलिसांना सांगितल्या. पण संबंधित डॉक्टरसोबत त्याचे काही संबंध होते का? किंवा दोघांच्या संमतीने लैंगिक संबंध ठेवण्यात आले होते का? याबाबत जेव्हा त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याबाबत बदनेने अद्याप मौन बाळगल्याची माहिती आहे.
साताऱ्यात डॉक्टर तरुणीने जिथं जीव दिला, त्या हॉटेलसमोरच आज मुख्यमंत्र्यांचा कृतज्ञता समारंभ, नव्या वादाला तोंड फुटणार?
कर्ज काढून लेकीला डॉक्टर केलं
दरम्यान, गरीब कुटुंबातून आलेल्या या डॉक्टरच्या वडिलांनी कर्ज काढून आणि पैशांची बचत करून आपल्या मुलीला डॉक्टर बनवले होते. दररोज डझनभर मृतदेहांचे शवविच्छेदन करणारी त्यांची मुलगी इतकी निराश आणि हताश कशी झाली या प्रश्नाचं उत्तर कुटुंबाला सापडत नाहीये.

