गेल्या तीन महिन्यांत प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची गुरुवारी दुसऱ्यांदा भेट घेतली. पक्षासाठी रणनीती आखण्याबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. परंतु, किशोर यांनी तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा निराधार असल्याचे पार्थ पवार यांनी म्हटले असले तरी सुनील तटकरे यांच्या विधानामुळे पक्षांतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले.
Mumbai FDA Raid: मुंबईत तुकाराम मुंढेंचा मोठा दणका: IIT पवईच्या कॅन्टिनसह १० हॉटेलवर धाडी, ४ परवाने निलंबित, ५ व्यवसाय बंद करण्याचे आदेशतटकरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशांत किशोर यांच्यावर नाव न घेता शरसंधान केले. ‘नुसत्या सल्ल्यावर निवडणुका जिंकता येत नाहीत. आम्ही प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे आहोत’, असे तटकरे म्हणाले. ‘माझ्या राजकीय जीवनात कुठल्याही सर्वेक्षणावर मी आजवर विश्वास ठेवलेला नाही. प्रशांत किशोर यांची पक्षात सल्लागार म्हणून नियुक्ती झाली की नाही, याची मला माहिती नाही. पण, ज्या अर्थी मला माहिती नाही, म्हणजे ती झालेली नाही. प्रशांत किशोर हे जरी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना भेटले असले तरी निर्णय मात्र कोअर कमिटीच्या बैठकीतच होतो’, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
‘२०२४च्या लोकसभा निवडणुकीत मी निवडणूक जिंकणार नाही, असे सर्वेक्षण असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, ते सर्व खोटे ठरवत मी निवडून आलो. शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करणारे कार्यकर्ते असल्याने जनतेत जाऊन काम करण्याची आम्हाला सवय आहे. त्यातूनच आम्हाला मतदारांचा कलही लक्षात येतो. लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी ‘डिझाइन बॉक्स’ ही कंपनी जरी सोबत घेतली तरी त्यांनी एक संकल्पना मांडली. पण ती संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अजित पवार यांच्यासह आम्ही अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. त्याचा लाभ आम्हाला विधानसभा निवडणुकीत झाला’, याची आठवणही तटकरे यांनी करून दिली.
Vikhroli Crime : घरात जाल, तर माझ्यावर अतिप्रसंग करताय म्हणून ओरडेन; विक्रोळीत बापलेकाला संपवलं, जावेने धमकावलं, पण शेजाऱ्यांनी ट्रिक वापरुन पकडलंराष्ट्रीय कार्याध्यक्ष असलेले प्रफुल पटेल यांचे पद निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या कार्यकारिणीत जाहीर न करणे, सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, आदींमुळे पटेल, तटकरे यांच्यासारखे नेते नाराज असल्याची पक्षात उघड चर्चा होऊ लागली. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त करण्याच्या चर्चेनंतर पक्षातील ही दरी वाढत असल्याचे दिसू लागले होते.
नुसत्या सल्ल्यावर निवडणुका जिंकता येत नाहीत. मी माझ्या राजकीय जीवनात कुठल्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवलेला नाही.- सुनील तटकरे
