Ratnagiri Youth Drown In Ganpatipule Sea: गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेलेल्या एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. हा तरुण पुण्याहून फिरायला आला होता.
24 ऑक्टोबर रोजी हे कुटुंब गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आले होते, त्यावेळी समुद्र स्नानाचा आनंद घेत असताना निखिल हा समुद्रात असतानाच एक मोठी लाट आली यातच निखिल हा गटांगळ्या खाऊ लागला. गुरुवारी सायंकाळी पाच वाजवण्याच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. गणपतीपुळे समुद्रकिनारी पोहत असताना मोठी लाट आल्याने खोल पाण्यात ओढला गेला निखिल समुद्रात बुडत असल्याचे लक्षात येताच कुटुंबाने आरडाओरडा केली स्थानिकांनी निखिल याचा शोध घेण्याचे आटोकाट प्रयत्न केले मात्र या दुर्दैवी घटनेत निखिल बेपत्ता झाला होता. त्याचा शोध सुरू होता.
Ratnagiri News: माझ्या मुलीचा खूप छळ केला, लेक गमावलेल्या आईने काय-काय सांगितलं? रत्नागिरी विवाहिता मृत्यू प्रकरणात नवी माहिती
बेपत्ता असलेल्या निखिल याचा मृतदेह 25 ऑक्टोबर शनिवारी सायंकाळी रोजी गणपतीपुळे जवळील मालगुंड येथे एका रिसॉर्टच्या मागच्या बाजूस मिळाला आहे. निखील शिवाजी वाघमारे (वय 18 वर्षे, रा. केशवनगर, सर्वे नं. 5, घळसाशी डेरी जवळ, केशवनगर मुंडवा, पुणे) असा मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने वाघमारे कुटुंबावरती दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
निखिल याला तात्काळ स्थानिकांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे नेण्यात आले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निखिल याला तपासून अधिकृत मृत घोषित केले. पुढील कार्यवाही झाल्यानंतर निखिल याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, स्थानिकांकडून मिळणाऱ्या सूचना याचं पालन सगळ्याच पर्यटकांनी तंतोतंत करणे आवश्यक आहे, म्हणजे अशा दुर्दैवी घटनांना आळा बसेल, अशा प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहेत. या सगळ्या घटनेची नोंद गणपतीपुळे जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास रत्नागिरी जयगड पोलीस ठाण्याचे साळवी करत आहेत.

