• Fri. Sep 4th, 2026

Abhijeet Dipke: आदिवासी आंदोलनाला ‘सीजेपी’चे बळ; मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत तळ ठोकण्याची दीपके यांची घोषणा

नाशिक : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांना सेंट्रल किचनमधून शिक्षण मिळते की जेवण, याचीच माहिती नाही. असा मंत्री आदिवासींचा विकास काय करणार,’ असा सवाल करून कॉक्रोच जनता पार्टीचा (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

मंत्री डॉ. उईके यांचा राजीनामा, आंदोलनाला ‘तमाशा’ म्हणणाऱ्या सचिवावर कारवाई; तसेच आदिवासींचा आवाज पोहोचवण्यासाठी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा दीपके याने केली आहे. दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषद शाळा व आश्रमशाळांची एकत्रित पाहणी करण्याचे आवाहन दीपके याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

Nashik Dengue Cases: नाशिककरांनो काळजी घ्या! डेंग्यूचा शहराला डंख, रुग्ण शंभरीपार, ऑगस्टमध्ये 45 बाधित; धूरफवारणी कागदावर आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहातील प्रश्नांसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून नाशिक शहरातील ईदगाह मैदानावर आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांची शिष्टाई अयशस्वी ठरल्यानंतर बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी, तर गुरुवारी (दि. ३) शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून आंदोलनाला आता राजकीय धार आली असून, सरकारविरोधातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

आश्रमशाळांमधील उघडी शौचालये, अस्वच्छ पाणी, निकृष्ट अन्न आणि विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टांची छायाचित्रे दाखवून त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘महाराष्ट्रातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना एकत्र करून या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटवू. गरज पडली तर मुंबईत धडक देऊ आणि राजभवनावरही आवाज बुलंद करू. या संघर्षात मी राजकीय नेता म्हणून नव्हे, तर विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,’ असा निर्धार दीपके यांनी व्यक्त केला.

Maharashtra TimesFDA New Rule : तुकाराम मुंढेंचा कडक आदेश, सामूहिक जेवण किंवा भंडाऱ्याचं नियोजन करायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट करावीच लागेलसचिवाला तत्काळ निलंबित करा

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तमाशा म्हणणारे सचिव विजय वाघमारे यांचाही दीपके यांनी समाचार घेतला. विभागाचा सचिव आंदोलनाला तमाशा म्हणतो. अशा सचिवाला मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली. ‘एसी केबिनमध्ये बसून निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी किमान एक दिवस उपाशी राहून दाखवावे. विद्यार्थ्यांची व्यथा काय आहे, हे त्यानंतर समजेल,’ असे दीपके म्हणाले.

Maharashtra TimesVishwas Nangare Patil: विश्वास नांगरे पाटलांनी करून दाखवलं; पुण्याची चर्चा असताना नागपुरात घेतला कठोर निर्णयमंत्र्यांचे कुत्रे एसीत, आदिवासी मुलं नरकात

‘मंत्र्यांचे कुत्रे एसी खोल्यांमध्ये आणि आलिशान गाड्यांमध्ये फिरतात; मात्र देशासाठी पदके आणणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना दार नसलेल्या शौचालयांचा वापर करावा लागतो, किडलेले अन्न खावे लागते. ही सरकारची विकासाची व्याख्या आहे का,’ असा संतप्त सवाल दीपके यांनी केला. गेल्या दोन वर्षांत ५९२ आदिवासी विद्यार्थ्यांचा उपचाराअभावी आणि सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे जीव जात असतील, तर सरकार झोपले आहे का? या लेकरांच्या जीवाची किंमत केवळ दोन लाख रुपये इतकीच आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed