Kalyan SATIS Flyover: कल्याण रेल्वे स्थानकातील वाहतूक सुधारणा प्रकल्पातील उड्डाणपुलाचे काम 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत हा प्रकल्प आता वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे.
या उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री 12:30 वाजल्यापासून पहाटे 2 वाजेपर्यंत गर्डर टाकण्याचे काम करण्यात आले. दरम्यान या प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर करत जानेवारी ते एप्रिल दरम्यान सॅटिस प्रकल्पासह सर्व उड्डाणपूल टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले. यामुळे नव्या वर्षात स्टेशन परिसरातील कोंडी फुटणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Bhiwandi News : खड्ड्यांमुळे बाईकवरुन पडला आणि क्षणात सगळं संपलं; हसता-खेळता एकुलता एक लेक गेला, कुटुंबाचा टाहो
कल्याण डोंबिवली महापालिकेची स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झाल्यानंतर कल्याण स्टेशन परिसरात वाहतूक सुधारणा प्रकल्पाच्या कामास 2021 साली सुरुवात करण्यात आली. 2023 मध्ये पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली. मुरबाड रस्त्यावरील सुभाष चौक बैलबाजार चौक दरम्यान 1630 मीटरचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीत भूसंपादन, एसटी स्थानकाच्या जागेवर काम करण्यास लागणारी ना हरकत, रेल्वेची जागा, हॉटेल्सची बांधकामे, गाळे धारकांचे पुनर्वसन यासारख्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडले होते. आता यातील १३४६ मीटरचे काम पूर्ण झाले असून अडथळे दूर झाल्याने उर्वरित काम देखील वेगाने पूर्ण करणे शक्य होऊ शकेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
कितीही काही केलं तरी नवी मुंबई पालिका निडणुकीत दिसेलच! श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना टोला
अडथळे दूर होणार
या प्रकल्पात रेल्वे स्थानक परिसरात एकाच ठिकाणी बस थांबा, रिक्षा वाहनतळ, दुचाकी, चारचाकी वाहनतळ प्रवासी पादचारी मार्गिका उपलब्ध करून दिल्या जाणार असून शहराबाहेरून येणारी वाहने रेल्वे स्थानक भागातील वाहतुकीला अडथळा ठरणार नाहीत अशा पद्धतीने उड्डाण पुलावरून परस्पर निघून जावीत अशा पद्धतीने या पुलाची उभारणी केली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी सांगितले.

