MLA Mahendra Thorve: शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. आमदार थोरवेंनी माझ्या पतीला मारहाण केल्याचा व त्याचवेळी त्यांना गायब केल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
हे आरोप करताना किशोरी आरडे यांनी सांगितले आहे की, “माझ्या पतीला आमदार महेंद्र थोरवे यांच्या सांगण्यावरूनच मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रार केली, पण कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.” पोलिस प्रशासनाकडून मदत मिळत नसल्यामुळे त्यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला आयोग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
‘हिंदूंकडून खरेदी करा’ म्हणणाऱ्या आमदार संग्राम जगतापांना पक्षातील आमदारानेच डिवचलं, अजित पवारांच्या आमदारांमध्ये जुंपली
दरम्यान, या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात एकच खळबळ माजली असून, सत्ताधारी पक्षातील आमदारावर असे आरोप होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
दरम्यान, या संदर्भात संपर्क साधल्यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “हे राजकीय हेतूने केलेले खोटे आरोप आहेत. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.”
दरम्यान, किशोरी आरडे मात्र त्यांच्या ठाम आहेत की, त्यांच्या पतीवर झालेल्या हल्ल्यामागे राजकीय दबाव आहे. त्यांनी न्याय मिळावा यासाठी आता मुख्यमंत्री आणि राज्य प्रशासनाकडे मदतीची याचना केली आहे. या प्रकरणामुळे रायगडमधील राजकीय वातावरण तापले असून, पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच चढाओढ, महायुतीत खदखद; गुलाबराव-महाजनांच्या प्रतिक्रिया
अधिकच्या माहितीनुसार किशोरी यांचे पती वकील तृशांत आरडे हे जुलै महिन्यापासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्यामागे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा हात आहे, असा आरोप किशोरी यांनी यापूर्वीही केला आहे. आमदार थोरवेंविरुद्ध तृशांत आरडे यांनी अनेक न्यायालयीन खटले चालवल्याने आरडे कुटुंबावर मोठा हल्ला झाल्याचा खुलासाही किशोरी यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

