• Wed. Mar 11th, 2026
    Sanjay Gaikwad: बुलढाणा जिल्ह्यात लाखावर बोगस मतदार? शिवसेना MLA संजय गायकवाडांचा मोठा दावा

    Sanjay Gaikwad: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीबुलढाणा जिल्ह्यात एक लाखावर बोगस मतदार असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

    sanjay gaikwad(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: सध्या बोगस मतदार याद्यांवर मोठी चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्ह्यात एक लाखावर बोगस मतदार असण्याची शक्यता व्यक्त केली. चार हजार मतदारांची नावे याद्यांमध्ये दोनवेळा असल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून, निवडणूक आयुक्तांनाही याची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.

    मतदार यादीतील घोळाच्या अनुषंगाने आमदार गायकवाड यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. मतदार याद्यांमध्ये एकाच मतदाराची दोन-दोन नावे असल्याचा दावा करीत आमदार गायकवाड म्हणाले, अनेक लोक जिल्ह्यात तीस, तीस वर्षे राहिले, अधिकारीही राहून गेले, त्यांचीदेखील नावे याद्यांमध्ये तशीच आहेत. ज्यांचे निधन झाले, अशांची नावेही कायम आहेत. हा आकडा जिल्ह्यात लाखाहून अधिक आहे.

    निवडणूक आयोग म्हणतो नावे काढू नका. दोन-दोन नावे असताना काढली का जात नाही, असा कोणता कायदा आहे की बोगस नावे कायम ठेवले जातात, असा सवालही गायकवाड यांनी केला.
    Maharashtra TimesRamdas Athawale: रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढवा; आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना आठवलेंची ‘ऑफर’
    आधार सीडिंगमुळे थांबेल ‘मतदारघोळ’
    मतदार याद्या पारदर्शक व्हाव्यात, मतदारांच्या नावांमधील घोळ थांबवण्यासाठी मृत्यू दाखला निवडणूक आयोगाशी जोडला तर कुणाचा मृत्यू झाला हे समजेल आणि ते नाव वगळले जाईल. शिवाय आयोगाशी आधार लिंक केल्यास बोगस मतदारांची अर्थात दोन-दोन नावे येऊ शकणार नाहीत, असा पर्याय आमदार गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला सुचविला आहे. निवडणूक आयोग ही विशेष संस्था असल्याने त्यांनी हा पर्याय ठरवायला हवा, असेही संजय गायकवाड म्हणाले.
    Maharashtra Timesकारागृहात ड्रग्ज पार्टी? नाशिक मध्यवर्ती कारागृहातील VIDEO व्हायरल, प्रशासनाकडून तपास सुरु
    विरोधकांना घरचा रस्ता दाखवा- एकनाथ शिंदे
    आपण मुंबईतून कोकणासाठी रोरो सेवा सुरू केली. आता येत्या निवडणुकीत विरोधकांसाठी गो-गो म्हणजे घरचा रस्ता दाखवा. लोकांना फेसबुक लाइव्ह चालत नाही, थेट भेट हवी असते’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना गुरुवारी लक्ष्य केले. ‘इज्जत गेली गावाची आणि मग आठवण आली भावाची’, ही म्हण कोणाला लागू पडते हे मी सांगत नाही, असेही ते म्हणाले. रत्नागिरी येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत,आमदार नीलेश राणे, रवींद्र फाटक माजी आमदार राजन साळवी, राजन तेली आदी उपस्थित होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा