Latur Freshers Party Youth Killed in Fight : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजच्या फ्रेशर्स पार्टीमध्ये नाचताना धक्का लागल्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला रुग्णालयात टाकल्यानंतर तो कोमात होता. आज त्या तरुणाचा हृदयद्रावक अंत झाला आहे.
कॉलेजची प्रेशर पार्टी ठरली शेवटची
वरील कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी आयोजीत करण्यात आली होती. या दरम्यान सर्व विद्यार्थी या पार्टीत सहभागी झाले होते. त्यानंतर या महाविद्यालयाशेजारीच रिहान शेख आणि इरफान पठाण (दोघेही रा. चौधरी नगर, लातूर) व त्यांच्यासोबत इतर दोघेजण यांनी विद्यार्थी सुरज धोंडीराम शिंदे (रा. प्रगती नगर, लातूर) यास काठीने मागील भांडणाची कुरापत काढून गंभीररित्या जखमी केलं. सुरज शिंदे हा कोमात होता त्याचा उपचारादरम्यान लातूरच्या एका खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. या प्रकरणात एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये सुरज शिंदे याचा मित्र आदित्य याने दिलेल्या तक्रारीवरून रिहान शेख आणि इरफान पठाण यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणासाठी हाणामारीचा असा गंभीर प्रकार होणे यावरून लातूर शहरात शिक्षणासाठी असलेल्या पाल्यांविषयी पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Nandurbar News : जे काम करायचा, त्यानेच दगा दिला! विषारी सापाला पकडताना चावा घेतला; लाडका मनीष सर्वांना सोडून गेला
देशभरातून शिक्षणासाठी विद्यार्थी येतात लातूरमध्ये
लातूर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते. शिक्षण घेण्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांचा कल हा लातूर शहरामध्ये पाहायला मिळतो. मात्र, मागील काही दिवसांपासून लातूरमध्ये वाढत चाललेल्या गुंडगिरीमुळे यावर परिणाम होईल का? असं बोललं जात आहे. 11वी आणि 12वी साठी राज्यभरातून विद्यार्थी लातूरमधील महाविद्यालयात प्रवेश घेतात. मात्र, असे गंभीर प्रकार समोर येताना दिसत आहेत, यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

