Harsool Prisoner Ends Life: हर्सूल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या विजय गोरे या कैद्याने लोखंडी गजावर डोके आपटून आत्महत्या केली. वडिलांच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मानसिक अस्वस्थतेमुळे त्याला तात्पुरते बंदी म्हणून ठेवण्यात आले होते.
लोखंडी गजावर डोके आपटले
या प्रकरणात मध्यवर्ती कारागृह हसूर्ल येथील सुभेदार संजय रूपचंद अहीरराव (वय 56) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हसूर्ल कारागृहात भूम परांडा येथील अंतरगावात झालेल्या एका खून प्रकरणात विजय गोरे याला 17 ऑगस्ट रोजी हसूर्ल जेलमध्ये आणण्यात आले. हसूर्ल जेलमध्ये विजयला जुने सर्कल 16 विभाग बराक क्रमांक 14 मध्ये ठेवण्यात आले. पाच ऑक्टोबर रोजी सकाळी कारागृहाचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर सकाळी सातच्या दरम्यान विजय गोरे हा बराक क्रमांक 13 व 14 समोरील परिसरात फिरत होता. त्या वेळी अचानक विजय गोरेने बराक क्रमांक 16 समोरून जोरात धावून बराक क्रमांक 15 च्या लोखंडी गजावर डोके जोरात आपटून स्वत:ला दुखापत करून घेतली.
Chhatrapati Sambhajinagar: घर बांधायचं आहे, वडिलांना पैसे माग; तीन वर्ष त्रास सोसला, अखेर नको तेच घडलं, मन सुन्न करणारी कहाणी
या धडकेमुळे विजय गोरे याच्या डोक्यातून व तोंडातून रक्ता वाहू लागले होते. हसूर्ल कारागृहाच्या अधिकारी आणि कर्मचारी जखमी विजय गोरे याला तत्काळ जे. जे. हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेले. जे. जे. हॉस्पीटलमध्ये उपचार चालू असताना 6 ऑक्टोबर रोजी विजयचा मृत्यू झाला. गोरे हा हसूर्ल जेलमध्ये आल्यापासूनच शांत होता. तो कोणाशीही बोलत नव्हता. त्याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. यामुळे त्याला सर्कल 16 विभागाच्या 14 मध्ये तात्पुरते बंदी म्हणून ठेवण्यात आले होते, अशी माहिती कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
भुजबळ मराठ्यांना शत्रू समजतो, मनोज जरांगेंचा हल्लाबोल
वडिलांची हत्या केल्यामुळे झाली होती शिक्षा
भूम मधील अंतरगाव येथे विजय उर्फ बोधीराम गोरे हा त्याच्या परिवारासोबत राहत होता. त्याचे आणि त्याच्या वडिलांचे वारंवार वाद होत होते. आठ ऑगस्ट 2024 ला विजयचे वडील विक्रम गोरे ‘बाहेर जाऊन येतो,’ असे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, ते घरी आले नाहीत. दुसऱ्या दिवशीही ते घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी विक्रम गोरे यांचा मृ़तदेह बाणगंगा नदीत आढळला. त्यांच्या चेहऱ्यावर वार होते; तसेच हातापायावर जखमा होत्या. सदर घटनेबाबत विजय गोरे याला तिच्या आईने विचारले असता, त्याने विक्रम गोरे हा नालायक माणूस होता. त्याला मीच दोन दिवसांपूर्वी मारून नदीत फेकले, अशी कबुली दिली. अशी माहिती पोलिसांनी दिली.

