नांदेड जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील मुलाने परदेशात नोकरी मिळवली आहे. जयपाल शिरदे असे त्याचे नाव आहे. त्याला अमेरिकेतील हनवेल ऑटोमेशन कंपनीत नोकरी मिळाली. या यशामुळे शेतकरी कुटुंबात आशेचा किरण निर्माण झाला. जयपालने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले. तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
जयपाल शिरदे हा नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील तकबीड या छोट्याश्या गावातील रहिवासी आहे. त्याचे वडील गणेश शिरदे हे शेतकरी असून पाच एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांना तीन मुलं देखील आहेत. हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवले. जयपाल याच प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण परिमल महाविद्यालयात लातूर येथे पूर्ण केले.
Nanded Crime : ‘माझ्या बहिणीची पुन्हा छेड का काढलीस?’ भावाला दिदीची छेड काढल्याचा संशय, रागाच्या भरात दादाकडून नको ते काम…
२०२१ मध्ये जळगाव येथील शासकीय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे बी टेक पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नामांकीत ऑटोमेशन कंपनीत नोकरी लागली. एवढ्यावरच न थांबता जयपाल यांने विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न बाळगत प्रयत्न सुरूच ठेवले. काही दिवसापूर्वी अमेरिकेच्या हनवेल ऑटोमेशन कंपनीकडून चेन्नई येथे मुलाखती घेण्यात आल्या. देशभरातून शेकडो उमेदवार आले होते. त्यात जयपाल शिरदे हा एकमेव पात्र ठरला. हनवेल ऑटोमेशन ही सॉफ्टवेयर कंपनी टेक्सास राज्यातील डलास येथे कार्यरत असून अमेरिकेत प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे जयपाल याला महिण्याकाठी सात लाख रुपये पगार मिळणार आहे.
Nanded News : ‘कर्जबाजारी आणि धनगर समाजाला…’, चिठ्ठी दगडाखाली ठेवली अन् आयुष्याची दोर कापली, नांदेडमध्ये मेंढपाळाचं टोकाचं पाऊल
एकीकडे नांदेड जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.नायगाव तालुक्याला ही शेती पिकाला फटका बसला आहे. शेतकरी हतबल झाले असून त्यातच एका शेतकरी कुटुंबातील मुलाने यशाचे शिखर पार करत आई वडिलासोबतच नांदेडचे नाव उंचावले आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

