Ratnagiri Youth Dies in his Sleep : रत्नागिरीतील दापोलीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 22 वर्षीय सुजलचा झोपेतच करुण अंत झाला. त्याच्या अचानक जाण्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तरुणाच्या मृत्यूनं परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुजल हा आई-वडिलांना भाजी व्यवसायात मदत करायचा. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सुजल हा आपल्या आई-वडिलांच्या भाजी व्यवसायात मदत करत असे. तो मेहनती होता. मदतशील व मेहनती असलेला सुजल हा शांत व सुस्वभावी होता. नवरात्र उत्सवाच्या मिरवणुकीमध्येही तो आदल्या दिवशी आनंदाने सहभागी झाला होता. मिरवणुकीवरून घरी आल्यानंतर रात्री काही वेळ मोबाईल बघून तो झोपी गेला. मात्र, सुजल रात्री झोपला तो पुन्हा उठलाच नाही.
पुणे गँगवॉर! ‘बदला तो फिक्स, आता फक्त बॉडी मोजा’, आंदेकर टोळीच्या 5 समर्थकांचा माज, पोलिसांनी मुसक्या आवळल्या
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुजल संतोष तळवटकर हा राहत्या घरी रात्री जेवण करून झोपला. तो सकाळी झोपेतून उठला नाही. म्हणून त्याचा भाचा सुजलला झोपेतून उठविण्यासाठी गेला. मात्र, त्याची हालचाल झाली नाही. म्हणून त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. दापोली शहरात जवळ असलेल्या भागवत हॉस्पीटल येथे नेण्यात आलं. तेथील डॉक्टर यांनी तपासून त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. तळवळकर कुटुंबीयांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. नेहमीच हसता खेळता असलेला सुजल असा अचानकच सोडून गेल्यानं दापोली शहर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. काल शनिवारी सायंकाळी त्याच्यावर दापोली शहरातील काळकाई कोंड परिसरात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. श्री. देवी काळकाई देवी ट्रस्ट देवस्थान, काळकाई कोंड या संस्थेकडूनही शोक व्यक्त करण्यात आला आहे. सुजय याच्या पश्चात आई-वडील, एक लहान बहीण, आजी असा मोठा परिवार आहे.

