Jalna Youth Drowned : जालन्यातली भोकरदन तालुक्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. 6 महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या 24 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बकरीला वाचवायला गेला असताना तो स्वत: धरणात पडला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला.
नांजा ते भोकरदन रस्त्यादरम्यान या कोल्हापुरी बंधाऱ्याशेजारी दत्ता वाहत्या पाण्यात बुडालेला होता. बऱ्याच वेळानंतर बकऱ्या ह्या घरी गेल्या, पण दत्ता दिसला नाही. त्यानंतर त्याचे वडील ज्ञानेश्वर सोरमारे हे दत्ताला बघण्यासाठी रानात आले असताना दत्ताचा शोध घेतला. परंतु दत्ताचा काही पत्ता लागला नाही. रस्त्याच्या बाजूला असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याकडे येऊन त्याच्या वडिलांनी बघितलं असताना दत्ताच्या चपला या बंधाऱ्याशेजारी पाण्यावर तरंगत होत्या.
Nanded News : ‘कर्जबाजारी आणि धनगर समाजाला…’, चिठ्ठी दगडाखाली ठेवली अन् आयुष्याची दोर कापली, नांदेडमध्ये मेंढपाळाचं टोकाचं पाऊल
गावकऱ्यांनी या ठिकाणी दत्ताला काढण्यासाठी मोठी मेहनत घेतली. परंतु दत्ता हा गाळात फसला होता. या ठिकाणी भोकरदन येथील अग्निशामक दलाचे कर्मचारी कादरी यांच्यासोबत असलेल्या टीमने या ठिकाणी पाण्यात जाऊन शोध घेतला असता, दत्ता पाण्यात आढळून आला. गावकऱ्यांनी कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे उघडल्यानंतर दत्ताला बाहेर काढलं आणि भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. हृदयद्रावक बाब म्हणजे, दत्ता सोरमारे याचा 6 महिन्यापूर्वीच शिरसगाव घाटी येथील तरुणीशी विवाह झाला होता. सदर घडलेल्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

