Maharashtra Schools : राज्यातील शाळांबाबत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, ३९४ शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याची नोंदणी झालेली नाही. तर जवळपास आठ हजार शाळांची पटसंख्या दहाच्याही खाली आहे.
ग्रामीण भागातील शाळा रिकाम्या होत असल्याचं प्रमाण चिंताजनक
राज्यात एकूण दोन कोटी ११ लाख ८६ हजार ९४३ विद्यार्थ्यांची नोंद झाली. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे सात हजारांनी अधिक आहे. मात्र त्याचवेळी पाच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे विद्यार्थीसंख्या लाखोंनी वाढेल, असे संकेत असले, तरी ग्रामीण शाळा रिकाम्या होण्याचे प्रमाणही चिंताजनक आहे.
Mumbai Metro News : आता मुंबईतील मेट्रोसाठी ‘वन तिकीट’ ॲप, ५७ स्थानकांचे तिकीट एकाच वेळी काढता येणार; काय आहे प्रोसेस?
एकाही विद्यार्थ्याची नोंदणी नाही; ग्रामीण भागांत स्थिती बिकट
‘यूडायस-प्लस’वरील नोंदणीनंतर हाती आलेल्या आकडेवारीनुसार, पुण्यात सर्वाधिक ३७ शाळांत एकाही विद्यार्थ्याची नोंद झालेली नाही. रत्नागिरीतील २४, नागपूरमधील २३ शाळाही विद्यार्थ्यांविना आहेत. बुलढाण्यात २१ शाळांत शून्य पटसंख्या आहे. या आकडेवारीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ७१३ शाळांची पटसंख्या १०च्या खाली आहे. पुण्यात ६२७, रायगडमध्ये ६८२, तर सिंधुदुर्गमध्ये ५६९ शाळांत एवढीच मोजकी विद्यार्थीसंख्या आहे.
Mumbai Local Train : लोकलच्या २० फेऱ्या वाढणार, दहा अप आणि दहा डाउन फेऱ्यांची वाढ; कुठे-कोणत्या मार्गावर होणार फायदा?
मुंबई उपनगरांतील ३६०, मुंबई शहरातील ३४, ठाण्यातील १९९ आणि पालघरमधील १२४ शाळांतही विद्यार्थ्यांची संख्या १०च्या खालीच आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी २०० ते ३००, तर काही ठिकाणी १०० ते १५० शाळा अशा श्रेणीत आहेत. राज्यात एकूण सात हजार ९४६ शाळांत केवळ १ ते दहा विद्यार्थी नोंदले गेले आहेत.
शहरनिहाय शाळा
मुंबई शहर – ५
मुंबई उपनगर – २२
ठाणे – १५
पालघर – १९
रायगड – १२
Kolhapur School Issue | नेत्यांच्या शाळेला गाठीभेटी मात्र विद्यार्थ्यांना चिंता शाळा बंद होण्याची
जिल्हानिहाय शाळा
पुणे – ३७
रत्नागिरी – २४
बुलढाणा – २१
छत्रपती संभाजीनगर – १५

