राज ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यात हजेरी लावतील, अशी चर्चा होती. पण तसं काही झालं नाही. पण यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत राजकीय युती करणार का? याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“आता कोण बोललं की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला आम्ही काय केलं होतं? तेव्हा मी बोललेलो आहे, आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. “जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसात फूट पडू देणार नाही. मराठीवर हिंदीची सक्ती हे मी आज जाहीरपणाने सांगतोय. आमचा हिंदीला विरोध नाही. पण आच्यावर हिंदीची सक्ती करायची नाही. भाषावर प्रांत रचना झाली. त्या प्रांत रचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.”गुजराती लोकांना गुजरात मिळालं. बंगाली लोकांना बंगाल मिळालं. कानडी लोकांना कर्नाटक मिळालं. सगळेच राज्य, तसा मराठी माणसाला महाराष्ट्र मिळाला. प्रत्येक राज्याला राज्याचं सरकार, राज्याची राजधानी मिळालं. पण महाराष्ट्राला राजधानी मिळाली नव्हती. मराठी माणसाने रक्त सांडून ही मुंबई मिळवील. ही मुंबई व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे या ज्या कंड्या पिकवल्या जात आहेत, दसरा मेळाव्यात राज ठाकरे जाणार का? उद्धव ठाकरे येणार का? त्या सगळा मराठीद्वेष्टांना सांगतो, तुम्ही आमच्या मराठीला हात लावून दाखवा. तुमचा हात जागेवर ठेवणार नाही”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
“आमचं कुणाशी भांडण नाही. आतापर्यंत किती मारामाऱ्या झाल्या. आमच्या अंगावर येऊ नका. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवलं आहे, एकतर कुणाच्या अंगावर जायचं नाही आणि कुणी अंगावर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवायचा नाही. तीच शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. आम्हाला कुणाचं उणंदुणं काढायचं नाहीय. पण विशेषत: मी दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. एक म्हणजे हिंदुत्वावरुन आमच्यावर येऊ नका. तुमच्या सगळ्या टोप्या घातलेल्या फोटोंचे प्रदर्शन लावल्याशिवाय मी राहणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘कमळाबाईने चिखल करुन…’, उद्धव ठाकरेंनी तोफ डागली, गाढव कुणाला म्हणाले?
“आम्हाला प्रश्न विचारण्याआधी तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा. बटेंगे तो कटेंगे करायचं की राखी कधी बांधायचं. महाराष्ट्रात गोमाता आणि बाजूला नेवून खाता हे तुमचं हिंदुत्व आहे. तुम्ही संशयावरुन माणसं मानतात. गोमांस खातात संशयावरुन तुम्ही माणसं मारतात आणि इकडे गोमांस जावून खायचं ही कोणती पद्धत आहे. ईशान्य भारतात त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, त्यांच्या राज्यात गोमांस खातात. मग ह्यांना पक्षात कसं ठेवलं? मी भाजपला प्रेमाने सांगतो. संधीचं सोनं करा. जो चिखल केलाय तो करु नका. अशी संधी नेहमी मिळत नाही”, असं उद्धव ठाकरे भाजप नेत्यांना उद्देशून म्हणाले.

