Husband Commits Suicide after Killing Wife : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, पुण्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरगुती वादातून पतीने आधी पत्नीची गळा दाबून हत्या केली त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दसरा सणाच्या पूर्वसंध्येला, घरातच पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. मध्यरात्रीच्या सुमारास या वादातून अशोक गावडे यांनी पत्नी जयश्रीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर काही वेळातच अपराधगंडामुळे किंवा संतापातून अशोक यांनी राहत्या घरातील फॅनला गळफास घेऊन जीवन संपवलं. सकाळी गावकऱ्यांना ही घटना समजताच एकच खळबळ उडाली. ऐन सणासुदीत अशा घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
राज ठाकरे दसरा मेळाव्यात गैरहजर, सोबत येणार की नाहीत? उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा
पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पती-पत्नीतील कौटुंबिक वाद हा प्राथमिक अंदाज आहे. दौंड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अशोक व जयश्री हे साधे-सरळ आयुष्य जगत होते. मात्र, घरगुती कारणावरून वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर येत आहे. दसऱ्यासारख्या मंगलदिनी अशी शोकांतिका घडली, याची हळहळ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे, असं ग्रामस्थांनी सांगितलं.
Raigad Crime : जागेच्या वादासंदर्भात चर्चा करताना आरोपीचा गोळीबार, फिर्यादी बसलेल्या दिशेने एक राऊंड फायर; रायगडमध्ये खळबळ
बाप-लेक शेतात गेले आणि अनर्थ घडला
ऐन दसरा सणाच्या मुहूर्तावर बारामती तालुक्यात एक दुःखद घटना घडली आहे. बारामतीच्या तरडोली गावातील एका युवा शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तात्यासो संपत मासाळ (वय 33 वर्ष) रा. तरडोली असं या मृत्यू झालेल्या युवा शेतकऱ्याचं नाव आहे. या युवा शेतकऱ्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

