Youth Ends Life: एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
शेतात जाऊन विषारी औषध प्राशन
नवनाथ साहेबराव पवार (वय 25, राहणार वरखेड तालुका गंगापूर) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाच्या मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत नवनाथ हा गंगापूर तालुतक्यातील वरखडे येथील रहिवासी आहे. तो कुटुंबासह इथे राहत होता. नवनाथ पवारच्या कुटुंबामध्ये आई- वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार असल्याची माहिती आहे. दरम्यान, बुधवारी (18 सप्टेंबर) रात्री नऊ वाजेच्या सुमारास नवनाथ हा शेतात गेला होता. तिथे त्यांनी विषारी औषध प्राशन करून आपला जीव देण्याचा प्रयत्न केला.
रात्री वेगवेगळ्या खोलीत, सकाळी पत्नीची अर्धजळालेली बॉडी सापडली, भाजप नेत्यावर गंभीर आरोप
ही बाब त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथे उपचार सुरू असतानाच नवनाथची प्राणज्योत मालावली.
नवनाथ गेल्याचं कळताच नातेवाईकांनी रुग्णालयात एकच टाहो फोडला. या घटनेमुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, नवनाथ ने हे टोकाचं पाऊल का उचललं? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी शिल्ल्लेगाव पोलिस ठाण्यामध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार बिघोत करीत आहेत. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या पोलिस करत आहेत. या घटनेने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

