Solapur Crime: सोलापुरातील माहिती अधिकार कार्यकर्ता अनमोल केवटे याची लातूर-सोलापूर रोडवर हत्या करण्यात आली असून या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनमोल केवट याच्या खून प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात चार जण सहभागी असल्याचं उघड झालं आहे. या घटनेतील आरोपी विष्णू मामडगे आणि त्याचा चुलत बंधू मंथन मामडगे हे दोघेही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखेचे एक आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे एक अशी दोन पथके आरोपींच्या शोधासाठी पाठवण्यात आली आहेत. शुभम पतंगे, वैभव स्वामी, मंथन मामडगे अशी आरोपींची नावे आहेत. शुभम पतंगे, वैभव स्वामी यांना पोलिसांनी अटक केली असून अनमोल केवटे याची हत्या का केली, खरंच गाडीला कट मारल्याचा राग होता का, याबाबत लातूर पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोण होता अनमोल केवटे?
सोलापुरातील अनमोल केवटे हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीसोबत माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करत होता. शहरातील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि कर्मचाऱ्यांविरोधात त्याने तक्रार अर्ज केले होते. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागत भ्रष्ट अधिकाऱ्यांची त्याने गोची केली होती.

