• Wed. Mar 11th, 2026
    Beed News : बीडच्या मस्साजोगमध्ये हृदयद्रावक घटना, कंत्राटी कर्मचाऱ्याचा करुण अंत; अमोलसोबत नेमकं काय घडलं?

    Beed Contract Wireman Dies : बीड जिल्ह्यामध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. विजेच्या खांबाला पकडताच विजेचा जबर धक्का लागला, अन् यात महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मस्साजोग कंत्राटी वायरनमचा शॉकमुळे मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुकेशनी नाईकवाडे, बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील (Massajog) कंत्राटी वायरमनचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, मस्साजोग येथील रहिवासी असलेल्या अमोल लव्हाळे तरुण येथील महावितरण केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. महावितरण विद्युत केंद्रात असलेल्या खांबावर सतत पाऊस पडल्यामुळे तो ओला झाला होता. मात्र त्याच परिस्थितीत त्याने खांबाला पकडताच ही घटना घडली. त्याला विजेचा जबर धक्का लागला आणि त्याचा करूण अंत झाला असल्याचं प्राथमिक माहितीवरून समोर आलं आहे. (Beed Contract Wireman Die)

    घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील महावितरणच्या विद्युत केंद्रात ही घटना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

    Maharashtra TimesThane News : तू मला आवडतेस… माझ्या सोबत येतेस का?, फुल विक्रेत्या महिलेसोबत अश्लील वर्तन; बोगस पत्रकाराला जमावाने दिला चोप

    सातवीतील पोरीचं लग्न लावून दिलं

    बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीचे तिच्या आई आणि नातेवाईकांनी लग्न लावून दिलं आणि नंतर सदर मुलीच्या आईनेच आपल्या जावयासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचं उघड झालं आहे. सातवीत शिक्षण घेत असताना माझ्या मनाविरुद्ध आई आणि नातेवाईकांनी विवाह लावून दिल्याची तक्रार पीडित मुलीने धारूर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. लग्न झाल्यापासून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत केला आहे.

    Maharashtra TimesNagpur Crime : महिला मैत्रिणीसोबत बोलताना तरुणांनी अडवलं, ‘तिच्याशी का बोलतो’ विचारत पोटात वार; प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाला संपवलं

    मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या दोन लहान बहिणी आईसोबत राहत होत्या. त्यांचे वडील 2016 मध्ये घर सोडून गेले होते. त्यानंतर 2017 मध्ये ही मुलगी सातवी इयत्तेत असताना तिच्या आईने गावातील एका तरुणासोबत तिचे लग्न धारूरमधील एका मंदिरात लावून दिलं. या लग्नाला मुलीचा विरोध होता, लग्नाला आपली इच्छा नसतानाही आई, सासू, मावशी, चुलत दीर, चुलत सासरा आणि चुलत सासू यांनी लग्न लावले, असे फिर्यादीत सांगण्यात आलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा