One Killed in Explosion While Welding Tanker : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टँकरला वेल्डिंग करण्सासाठी टँकरमध्ये उतरला असता स्फोट झाला. यात एका जणाचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत.
लक्ष्मण विनायक कुबेर (वय 32, रा. गेवराई कुबेर) असx मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर संतोष वैजनाथ महानोर (वय 35, रा. शेकटा, ता. गेवराई, जि .बीड) आणि रमेश रामदास गावडे (वय 22, रा. धुळे) असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा एमआयडीसी येथील हरमन कंपनीजवळ प्लॉट क्रमांक 68 येथे वेल्डिंगचं वर्कशॉप आहे. या बिल्डिंगच्या दुकानामध्ये काल रविवारी सायंकाळी इथेनॉलची वाहतूक करणारा टँकर एम.एच 20 जीसी 3288 क्रमांकाचा आला. टँकर चालकाने टँकरला वेल्डिंग करण्याचं सांगितलं. यावेळी वेल्डर लक्ष्मण कुबेर टँकरमध्ये उतरला त्याने वेल्डिंग करायला सुरुवात करताच टँकरचा स्फोट झाला. या स्फोटात लक्ष्मण कुबेर हा गंभीर जखमी झाला. संतोष मनोहर, रमेश गावडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
Banjara Community Protest : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज रस्त्यावर उतरला, ST कोटासाठी लढा उभारला; पण मुंडेंच्या त्या वक्तव्याने संताप
या भीषण दुर्घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत, उपनिरीक्षक भारत निकाळजे हे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी लक्ष्मण कुबेर याला तपासून मृत घोषित केलं. तर इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मण यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात टाहो फोडला. लक्ष्मण यांच्या पश्चात आई, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे. करमाड पोलिस स्टेशनमध्ये याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Nagpur News : बँकेचं थकलेलं कर्ज, शेतातून उत्पन्न नाही; विवंचनेतून दाम्पत्यानं शेतात कीटकनाशक औषध घेतलं; नवऱ्याचा अंत, बायकोची मृत्यूशी झुंज
डोळ्यादेखत आई आणि लेक गेली
आई आणि मुलीला छत्रपती संभाजीनगरकडे घेऊन जाणाऱ्या दिव्यांग व्यक्तीच्या स्कुटीला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होतं की आजी आणि नातीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दिव्यांग व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जळगाव राष्ट्रीय महामार्गावर घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

