एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत काहीतरी मोठं घडत असल्याची माहिती मिळत आहे. मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी आज रात्री महत्त्वाची बैठक पार पडत आहे. स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत दाखल आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या घडामोडींचं मुख्य केंद्र आज मंत्री दादा भुसे यांचा मुंबईतील मंत्रालयाच्यासमोर असणारा ‘जंजिरा’ बंगला आहे. या बंगल्यात आज मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची दादा भुसे यांच्या निवासस्थानी अतिशय महत्त्वाची आणि हायव्होल्टेज अशी बैठक पार पडत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे केवळ मंत्रीच नाहीत तर राज्यभरातील शिवसेनेचे आमदार आणि खासदार यांच्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांसाठी स्नेहभोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे डिनर डिप्लोमसी बघायला मिळत आहे. या बैठकीत शिवसेनेची रणनीती ठरत असल्याची माहिती मिळत आहे. या रणनीतीकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करत आहेत. विरोधक सत्ताधारी महायुती सरकारला घेरण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीय. तसेच आगामी निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढावं की एकत्र लढावं याबाबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचं मंथन सुरु आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षांमध्ये देखील सुप्त स्पर्धा बघायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांचं महायुतीत खच्चीकरण केलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातही सध्या घडामोडी घडत आहेत. शिंदेंच्या नेतृत्वातील आजच्या बैठकीत काय ठरतं? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान, विरोधी पक्षातही जोरदार हालचाली सुरु आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाचं आज शिबिर पार पडलं. या शिबिरमध्ये मतचोरीच्या मुद्द्यावरुन चर्चा झाल्याचीदेखील माहिती आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातही बैठकांवर बैठका पार पडत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नुकतीच जिल्हाप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या सूचना आपल्या जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत. त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेत हालचाली वाढल्या आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा