Parbhani Three People Died due to Electric Shock : परभणीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान परभणीच्या पालम शहरातील बालाजी नगर परिसरात राहणारे शेख शफीक शेख मुसा यांच्या मालकीची पान टपरी शहराच्या दुसऱ्या भागात बसविण्यात आली होती. ती पान टपरी उचलून आपल्या घरी आणण्यासाठी त्यांनी बैलगाडी आणि अन्य सात आठ जणांना सोबत घेऊन गेले होते. त्या जागेवरील पान टपरी बैलगाडीमध्ये टाकून ते आपल्या बालाजी नगर परिसरामध्ये घेऊन आले. घराजवळच पान टपरी बसवण्यासाठी त्यांचाच माणूस होता. बालाजी नगरात घराजवळ बैलगाडीत पान टपरी घेऊन आल्यानंतर ती खाली उतरवण्याचा सर्वांनी प्रयत्न सुरू केला. दरम्यान बैलगाडीवरून पान टपरी घसरली आणि पान टपरीचा एक पायवरून जाणाऱ्या विद्युत तारेला चिटकला. त्यामुळे संपूर्ण टपरीमध्ये करंट उतरलं टपरीला हात लागलेल्या सहा जणांना विजेचा जबर धक्का बसला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले.
‘शिक्षक दिनाला मुस्लिम शिक्षकाला मंदिरात सत्कारासाठी का बोलावले?’, ‘त्याने’ गोंधळ घातला अन् करेक्ट कार्यक्रम
मृत पावलेल्या तिघांमध्ये सिद्धार्थ नरहरी बावळे, शेख शफीक शेख मुसा व शेख शौकत शेख मुसा या तिघांचा समावेश आहे. तर जखमी झालेल्यांमध्ये शेख फरहान शेख महबूब (वय 16), अशोक शाखेर शेख (वय 18) आणि शेख असलम शेख गुड्डू हे तिघेजण जबर जखमी आहेत. या जखमी तिघांवर सध्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मागील दोन दिवसापासून जिल्हाभरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यातच आता विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू झाल्याने जिल्हाभरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

