Beed Accident : राज्यात अपघातांचं प्रमाण झपाट्याने वाढत चाललं आहे. त्या अपघातांमध्ये अनेकजणांचा मृत्यू देखील होत असल्याचं समोर येत आहे. असाच एक भीषण अपघात बीडमधील परळी तालुक्यात झाला आहे. या अपघातात आजोबा आणि त्यांच्या नातीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं गावात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यश कंपनीच्या टिप्परने बुलेट गाडीला धडक दिली असल्यानं हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. हा अपघात जुन्या पांगरी गावामध्ये नागरगोजे यांच्या आखाड्यासमोर घडला असून या अपघातात जळगव्हाणचे सरपंच यांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. जळगव्हाणचे सरपंच वसंत ताराचंद चव्हाण (वय ५५) असं त्यांचं नाव आहे. तर सरपंच वसंत चव्हाण यांची नात श्रुती विजय चव्हाण (वय ८ वर्षे) हिचा देखील जागीच मृत्यू झाला आहे. तर पत्नी कस्तुराबाई वसंत चव्हाण या गंभीर जखमी आहेत.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी मिळणार? हफ्त्याच्या वितरणासंदर्भात मोठी अपडेट समोर
दरम्यान, आजी-आजोबा आपली नात श्रुतीला दुपारी परळी येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेले होते. तिच्यावर तिथे उपचार झाल्यानंतर गावाकडे परतताना सायंकाळी अपघात घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्यासोबत त्यांची नात पण मयत झाल्याचं समोर येत आहे. घटनेचा पंचनामा सुरू असून नेमका अपघात झाला की घातपात झाला? हे पोलिस तपासात समोर येणार आहे.
Govind Barge Death Case : नर्तकीच्या प्रेमात उपसरपंचाचा भयंकर शेवट, घातपाताचा संशय; बर्गेंचा भाचा म्हणतो, ‘मामाकडे पिस्तुल नव्हते’
बीडमधल्या उपसरपंचाची सोलापूरमध्ये आत्महत्या
बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील माजी उपसरपंचाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील सासुरे येथे उघडकीस आली आहे. उपसरपंचाचा जागीच मृत्यू झाला असून ही त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३८) असं मयत माजी उपसरपंचाचं नाव असून ते बीडमधील गेवराई येथील रहिवासी आहेत. दरम्यान, गोळी झाडून या तरुण सरपंचाने स्वतःला संपवलं आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.

