Pune Gang War Update : पुणे गँगवॉर प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आरोपींच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आरोपींच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
अमन पठाण, सुजल मेरगु यांचे वकील मनोज भाने यांनीदेखील यावेळी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “जी एफआयआर झालेली आहे अफ्टर थॉट झालेली आहे. त्या आठवड्यात काही घटना घडल्या आहेत, त्यातील एक घटना भारती विद्यापीठ इथले होती. भारती विद्यापीठच्या घटनेत एका इसमाला पकडलं गेलं. त्या इसमाने काही जणांची नावे घेतली. त्यामध्ये असं सांगण्यात आलं की, रेकी करुन खून करण्याकरता भारती विद्यापीठात आले होते. भारती विद्यापीठाच्या एफआयआरनंतर समर्थ पोलीस ठाण्यात एक एफआयआर झाली. आपण हा सिनॅरिओ लक्षात घ्यावा”, असं वकील मनोज भाने म्हणाले.
:समर्थ पोलीस ठाण्यात एका आरोपीला पकडलं गेलं. त्याच्याकडे पिस्तूल सापडली. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी खून होतो. घटना एवढी सिंपल आहे, दोन जण आले, गोळीबार केली आणि निघून गेले. पण एफआयआरमध्ये पाहिलं, तर अफ्टर थॉट या सगळ्यांची नावे घेतली. त्यामध्ये बंडू आंदेकर पासून सर्वांची नावे घेतली. तसेच असं दाखवलं की, ह्यांनीच कट रचून सर्वांचा खून केला आहे. आता याच एफआयआरमध्ये पॅरा 2 मध्ये दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये फिर्यादीने म्हटलं आहे की, वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर आमच्यावर मारण्यासाठी पाळत ठेवून होते. पण या संदर्भात कुठेही तक्रार किंवा एनसी झाली नाही. त्यानंतर आता ह्यांचा कुणीतरी येऊन खून करुन गेलं”, असं वकील भाने म्हणाले.
पुणे गँगवॉर! ‘मी माझ्याच नातवाला का संपवू?’; बंडू आंदेकरचा कोर्टात सवाल, वाचा A टू Z युक्तिवाद
“आरोपी क्रमांक एक बंडू आंदेकर यांचा नातू देखील गेलेला आहे. त्याचं दु:ख त्यांनादेखील आहे. घरातीलच माणसांच्या खुनामध्ये घरातील माणसं अडकवण्यात आली. कारण गणेश कोमकर, संजीवनी कोमकर यांचा वनराज आंदेकर खुनात सहभाग होता. तसं त्यांच्या चार्जशीटमध्ये निषपन्न झालेलं आहे. हा राग कुठे काढायचा? आमचा त्यांच्यावर राग नव्हता. त्यांचेच हात रक्ताने माखलेले आहेत. कट कारस्थान रचला हा एक शब्द ग्राह्य धरला गेला पाहिजे. ह्यांनी आधी आमचाच खून केला आणि आमच्याच कुटुंबातल्या लोकांना गोवण्यात आलं. त्याच्यामध्ये वातावरण निर्माण करण्यात आलं”, असा दावा त्यांनी केला.
“आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, यामध्ये जे स्पॉटमध्ये गेले त्यांचं म्हणणं आहे की, मी ओळखलं. अहो, ही ओळख कशी पटली हेच महत्त्वाचं आहे. माझे आरोपी जे स्पॉटमध्ये दाखवले आहेत त्यांचा या गुन्ह्याशी कुठलाही संबंध नाहीत. बंडू आंदेकर, त्यांचे कुटुंबिय यांचा कुठलाही संबंध नाही. या प्रकरणात महिलांचा समावेश नाही. पण सरसकट नावे टाकण्यात आली”, असं वकील भाने म्हणाले.

