Chhatrapati Sambhajinagar : ड्रग्स पेडलरच्या घरात छापा, गावठी कट्यासह जादूटोण्याच्या कवट्या, भुताचा मुखवटा जप्त
छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगलीच्या गुन्ह्यातील आरोपी आणि आता अमली पदार्थ विकणाऱ्या पेडलरच्या घरात अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने छापा मारला. यात गावठी कट्यासह काळ्या जादू टोण्यासाठी वापरली जाणारी जनावरांची हाड, कासवाचं कवच, कवट्या, हंटरसह ३४ वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
