Sanjay patil News : जळगावचे नेते संजय पाटील गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचे दोन्ही मोबाईल बंद असून त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? अपहरण झालं आहे? काहीच माहिती समोर आलेली नाही. शेवटचे कुठे दिसलेले जाणून घ्या.
संजय लोटन पाटील असं बेपत्ता झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं नाव आहे. ते मूळचे धरणगाव तालुक्यातील दोनगावचे रहिवासी आहेत. मात्र सध्या ते धुळे येथे वास्तव्याला होते. काही दिवसांपूर्वी ते धुळ्याहून गावाकडे जात असल्याचे सांगून घरातून निघाले. त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद आहेत.
Himachal Landslide : शिमल्यात पर्यटकांच्या बसवर दरड कोसळली, महाराष्ट्रातील महिलेचा मृत्यू, 15 प्रवासी जखमी
संजय पाटील यांच्या घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच जळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार 2000 दिली आहे. त्या तक्रारीवरून पोलिसांनी जळगाव शहरातील काही भागातील सीसीटीव्ही देखील बघितले. गोलाणी मार्केट रोडवर संजय पाटील हे शेवटचे दिसले. या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात आले. यात संजय पाटील यांनी शहरातील एका बँकेतून काही पैसे काढले, त्यानंतर कोर्ट चौकाकडे जाताना दिसले दरम्यान, त्यांचे दोन्ही मोबाइल बंद झाले असून ते बेपत्ता झाले आहेत. संजय पाटील यांचे कोणा अपहरण केले किंवा संजय पाटील हेच स्वतः मोबाईल बंद करून बेपत्ता झाले असावे याचा देखील शोध पोलीस घेत आहेत.

