Nashik Gelatin Found : रविवारी दुपारी नाशिकमधील नंदिनी नदी काठावर तीन हजार जिलेटीनच्या कांड्या आढळल्याने खळबळ उडाली होती
मुंबई नाका पोलिस ठाण्यातील अंमलदार आकाश राम सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम 125, 288 सह भारतीय स्फोटक कायद्यान्वे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. टेम्पो चालक रिहान शेख, भंगार व्यावसायिक जाकीर अत्तार, कामगार दबीर अन्सारी व कंपनी प्रतिनिधी अशोक कर्डक अशी संशयितांची नावे आहेत.
Pune Crime : विवाहाच्या आमिषाने पुण्यातील हॉटेलमध्ये अत्याचार, सोशल मीडियावर ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीला लुबाडलं
काय आहे प्रकरण?
रविवारी दुपारी नंदिनी नदी काठावर तीन हजार जिलेटीनच्या कांड्या आढळल्या होत्या. मुंबई नाक्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरूटे यांच्यासह गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. संबंधित जिलेटीन कांड्या कालबाह्य असल्याचे ‘बीडीडीएस’ने स्पष्ट केले.
Akola Crime : माझे मिस्टर घरी नाहीयेत, दुपारी या! 52 वर्षीय ज्वेलरला लताने घरी बोलावलं, एवढ्यात नवरा पोहोचला अन्…
दरम्यान, गणेशोत्सवाचा जल्लोष वाढत असताना भरवस्तीत या स्वरूपाचे घातक पदार्थ आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात घातपाताचा प्रकार निष्पन्न झालेला नाही. मात्र, संशयितांनी जिलेटीनची हाताळणी करण्यात अक्षम्य निष्काळजी केल्याचे समोर आले.
मेंढपाळांचा अपमान चालणार नाही, आरोपींना तातडीने अटक करा; एसपी कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा
नेमकं काय घडलं?
कसारा येथील एका कंपनीकडे समृद्धी महामार्गाच्या कामकाजात दगड फोडण्याचे कंत्राट आहे. त्या कामासाठी खरेदी केलेल्या काही जिलेटीन कांड्या कंपनीच्या एका ट्रकमागील ‘स्टोरेज पार्ट’मध्ये ‘लॉक’ करून ठेवल्या. मात्र, ‘लॉक’ उघडत नसल्याने हा ‘स्टोरेज पार्ट’ विक्रीचा निर्णय कंपनीने घेतला. भंगार व्यावसायिक जाकीर अत्तारने तो भाग अधिकृतरित्या खरेदी केला. त्यात जिलेटीन आढळल्यानंतर पोलिसांना कळविण्याऐवजी ते फेकून दिले.

