MNS leaders join Shiv Sena : शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत खेड येथे मनसेच्या अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शिवसेनेत झेंडा हाती धरला
मनसे शहराध्यक्षा मीनल गांधी, मनसे कुंभारवाडा विभागप्रमुख नरेश मालवणकर, शाखा अध्यक्ष सुमित सकपाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय कदम, जि. प. माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, खेड तालुकाध्यक्ष सचिन धाडवे, शिवसेना महिला आघाडीच्या संजना कुडाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे खेड शहरातील शिवसेना संघटनेला नवे बळ मिळाले असून, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा विश्वास यामुळे आगामी काळात शिवसेना आणखी जोमाने काम करेल असा विश्वास संजय कदम यांनी यावेळी व्यक्त केला.
Parbhani Crime : भावपूर्ण श्रद्धांजली बायको, रविवारी WhatsApp स्टेटस, गुरुवारी शेतात विद्याचा जीव घेतला, दोन लेकरांचं मातृछत्र हरपलं
रामदास कदम यांच्या खेड तालुक्यातील जामगे येथील निवासस्थानी हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. “तळागाळातील कार्यकर्ते व पदाधिकारी सतत जनतेसाठी काम करतात, परंतु त्यांच्या कार्याची योग्य दखल घेणे तितकेच महत्त्वाचे असते. शिवसेना हा असा परिवार आहे जिथे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला स्थान मिळते आणि त्याला न्याय दिला जातो. याच भावनेतून झालेला पक्षप्रवेश संबंधित पदाधिकाऱ्यांसाठी आशादायक ठरला आहे” असा विश्वास यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
ना व्हिडिओ, ना फोटो! राज ठाकरेंनी मनसैनिकांना सांगितला नवा प्लॅन, सिक्रेट भाषण व्हायरल
Cardiac Arrest : कार्डिअॅक सर्जनलाच हृदयविकाराने गाठलं, रुग्णसेवा करतानाच डॉक्टर कोसळले, अवघ्या 39 व्या वर्षी जगाचा निरोप
दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नगरपरिषदांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवरती मनसेकडून शिवसेनेत होत असलेले हे पक्षप्रवेश महत्त्वाचे मानले जातात. दरम्यान आता राज ठाकरे यांनी वैभव खेडेकर यांना पक्षातून बडतर्फ केले असतानाच, त्यांना शिवसेनेसह भाजपाकडूनही पक्षप्रवेशाची ऑफर आहे. ते गणेशोत्सवानंतर कोणती भूमिका घेतात, हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.

