Chhatrapati Sambhajinagar News : छ. संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून घटस्फोटित महिला गर्भवती राहिली. बाळ नको असल्याने तिने जे काही केलं त्याने तुम्हालाची चीड येईल, भटक्या कुत्र्यांमुळे सर्व प्रकरण उघडकीस आलं.
नेमकं प्रकरण काय?
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मुळची वाशिम जिल्ह्यातील २४ वर्षीय अर्पिता (नाव काल्पनिक आहे) हिचा विवाह झाला. मात्र पतीसोबत पटत नसल्याने त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अर्पिता छत्रपती संभाजी नगर शहरातील पुंडलिक नगर भागात राहू लागली. शहरातील एका खाजगी कंपनीत काम करत होती. याच दरम्यान तिची ओळख एका तरुणाशी झाली. ओळखीतून त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. यातूनच अर्पिता गर्भवती राहिली. अनैतिक संबंधातून गर्भधारणा झालेलं कुटुंबाला कळू नये यासाठी ती गावी वाशिमला गेली. अर्पिताने घरी स्वतः स्वतःची प्रस्तुती करत बाळाला जन्म दिला. मुलाची नाळ कापत त्याला वेगळं केलं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाली.जन्मदात्या अर्पितानेच अवघ्या काही तासापूर्वी जन्मलेल्या बाळाला पोत्यात टाकून पोत डिवाइडरवर असलेल्या कचऱ्या टाकलं. किंचाळत असलेल्या बाळाचा आवाज ऐकून कुत्रे जमले. मोकाट कुत्र्यांनी पोतं ढिगारातून बाजूला करत रस्त्यात आणलं. याच दरम्यान रस्त्यावरून बस गेली या बसच्या दोन्ही चाकाच्या मधोमध पोतं आलं अन बाळ सुखरूप राहील.
Chhatrapati Sambhajinagar : चिमुकलीची २७ दिवसांची झुंज ठरली अपयशी, टेरेसवर गेली परतली नाही, मन हेलावणारी घटना
कुत्र्यांच्या हालचाली अन् पोत्यातून आवाज…
दरम्यान, याचवेळी कडा कार्यालयामध्ये कालवा निरीक्षक म्हणून काम करणारे भाग्येश पुसदेकर हे रस्त्याने जात होते. याचवेळी कुत्र्यांच्या हालचालीवरून त्यांची नजर पोत्याकडे गेली. पोत्यातून बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. त्यांनी जवळ जाऊन बघितलं तर त्यात बाळ होतं. ही माहिती त्यांनी नागरिकांना देत बाळाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. बाळाच्या शरीरावर कुत्र्यांच्या दातांच्या जखमा असून सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
Chhatrapati Sambhajinagar News : ‘अहो, मी फ्लॅट घेतलाय’; पेढे वाटत सुटला पण कोणालाच विश्वास नाही बसला, भांडाफोड झाल्यावर भयानक सत्य समोर
उंच टाचांच्या सॅंडलमुळे ती अडकली..
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अशोक भंडारी यांनी तात्काळ अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देत तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राऊत यांच्या पथकाने सीसीटीव्ही तपासले. त्यातील एका ठिकाणी महिला सीसीटीव्हीत आढळून आली. मात्र त्यात स्पष्ट होत नव्हतं. मात्र महिलेच्या पायात उंच टाचांची चप्पल आढळून आली. पोलिसांनी परिसरात अनेक घरांमध्ये जाऊन तब्बल १५० महिलांची चौकशी केली. त्यातील एका आपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर पोलिसांना संशय बळावला. तिथेच उंच टाचाची सॅंडल देखील आढळून आली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं सुरुवातीला उडवावीची उत्तरे दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही दाखवतात तिच्या डोळ्यात अश्रू तरवळले, त्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली.

