• Sun. Sep 13th, 2026

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 26, 2025
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन – महासंवाद




मुंबई, दि. २६ : उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर झालेल्या राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर राज्यपालांनी चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन राज्यघटनेच्या शिल्पकारांना पुष्पहार करुन अभिवादन केले.

राज्यपालांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे जाऊन वीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार व आमदार अमित साटम यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

००००







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed