Maharashtra Weather Forecast : राज्यात पावसाच्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हवामान खात्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबईसह राज्यभरातील इतर भागात कसं असेल पर्जन्यमान?
कुठे, कसा असेल पाऊस?
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी, तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Thane News : पावसाच्या पाण्याने घेरलं, पण चोरीच्या भीतीने घरातच ठाण मांडलं, दिव्यात अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला, १३ जणांची सुटका
मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज असून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरातही हलक्या ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाच्या सरींचा अंदाज आहे. त्याशिवाय कोकण आणि गोवा जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिम बंगाल भागात २५ ऑगस्टच्या सुमारास कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणाम राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, नद्या धोक्याच्या पातळीवर; अनेक मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत
मुंबई, ठाणे, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिकचा घाट परिसर, पुणे, सातारा या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. या भागात हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Heavy Rain In Maharashtra : मुंबई ते मराठवाडा पावसानं धुतलं, माणसांसह जणावरांचंही नुकसान
रायगड जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज
तर रायगड जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात २१ ते २५ ऑगस्टदरम्यान काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातही आजपासून २२ ऑगस्ट ते २५ ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुणे आणि सातारा घाट परिसरातही पावसाच्या मुसळधार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

