Raigad News : रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे उरणच्या मोरा बंदरात दुर्दैवी घटना घडली आहे. येथे आश्रयाला आलेल्या एका गुजराती मच्छीमार बोटीवरील खलाशी बेपत्ता झाला आहे. पोलीस व सागरी सुरक्षा रक्षक दल त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२५ रोजी मोरा बंदरात आलेल्या या मच्छीमार बोटींवर ६ खलाशी व एक तांडेल असे एकूण सात जण होते. यापैकी भरतभाई डालकी हा खलाशी शौचालयाला गेला होता. बराच वेळ झाला तरी बोटीवर दिसून आला नसल्याने त्याचा शोध घेतला, मात्र कुठेच आढळून आला नाही. त्यामुळे मोरा सागरी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
Pune News : हैदराबादहून मित्रांसोबत पुण्यात, सिंहगडावरील तानाजी कडावरुन दरीत कोसळला, आई-वडिलांचा गौतम अजूनही बेपत्ता
दरम्यान याप्रकरणी पोलीस व सागरी सुरक्षा रक्षक दलाच्या सदस्यांना बेपत्ता खलाशाचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गुजराती बोटींवरील खलाशी व तांडेल यांनाही सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे सुचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रायगड मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त संजय पाटील यांनी दिली. वारंवार मासेमारी बोट, प्रवाशी बोटीच्या दुर्घटना होत असल्यामुळे समुद्रातील प्रवास व व्यवहार अधिकच धोक्याचे झाल्याचे चित्र दिसत आहे.
पुण्यातही पावसामुळे दुर्दैवी घटना घडली आहे. सिंहगड किल्ल्यावर गेलेला तरुण बेपत्ता झाला आहे. वाचाल तर तुमच्या काळजाचा ठोका चुकेल अशी ही घटना आहे. २४ वर्षीय गौतम गायकवाड हा आपल्या मित्रांसोबत पावसाळी सहलीसाठी सिंहगड किल्ल्यावर आला होता. मात्र यावेळी तानाजी कडा येथून घसरून खोल दरीत पडल्याने तो बेपत्ता झाला आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास तो मित्रांसोबत सिंहगडावर पोहोचला होता. मात्र तोच त्याच्यासाठी काळ ठरला.

