Pune Sinhagard Fort Youth Collapse : पुण्यातील सिंहगड येथे अनेक पर्यटक पर्यटनसाठी येत असतात. काहींना तिथे फोटो काढण्याचा मोह आवरला जात नाही. अशीच एक धक्कादायक घटना काल बुधवारी घडलेली आहे. सिंहगडच्या तानाजी कडा येथून एक तरुण दरीत कोसळून बेपत्ता झालाय.
लघुशंका करुन येतो
गौतम गायकवाड हा सध्या हैदराबाद येथे राहत असून तो मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटणचा आहे. हैदराबाद येथून गौतमसह महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे , सूरज माळी असे ५ जण पुण्यातील सिंहगड फिरण्यासाठी आले होते. काल बुधवारी दुपारी ४:३० वाजता ते सिंहगडावर पोहोचले. सायंकाळच्या सुमारास ते तानाजी कड्याजवळ पोहोचले असता गौतमने ‘लघुशंका करून येतो’, असं मित्रांना सांगितलं. मात्र बराच वेळ झाल्यानंतर सुद्धा गौतम परत आला नाही. गौतम परत आला नाही म्हणून मित्रांनी त्याचा बराच वेळ शोध घेतला. तरी देखील गौतम आढळून आला नाही. अखेर जवळच त्याची चप्पल सापडली. पण गौतम काही आजूबाजूला दिसला नाही. त्यानंतर साधारण पावणेआठ वाजता गौतमच्या मित्रांनी १०० नंबरवर कॉल करून पोलिसांशी संपर्क साधला.
Chhatrapati Sambhajinagar : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्याचा मुंबईशी संपर्क तुटला; ट्रेन विमान सर्वच सेवा बंद, कोणता आणि काय कारण?
पोलिस स्टेशनचे सचिन वांगडे यांनी त्वरित घटनास्थळी पीएसआय दिलीप शिंदे, गुलाब आंबेकर व पोलिस हवालदार समाधान चोरमले यांना तातडीने घटनास्थळी पाठवले व हवेली आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधत त्यांना घटनेची माहिती दिली. सध्या सिंहगड भागात मुसळधार पाऊस असून, वार्याचा वेगही जास्त आहे. वाऱ्याचा व जमिनीचा अंदाज न आल्याने गौतम खोल दरीत कोसळला असल्याचं समजलं.
Delhi Triple Murder : मी अख्ख्या कुटुंबाला संपवलं, यापुढे मीही दिसायचो नाही तुम्हाला, तिहेरी हत्याकांडाचं गूढ उलगडलं
आपत्ती व्यवस्थापनचे तानाजी भोसले, पोलिस पाटील गणेश सपकाळ, संजय चोरघे, संदीप सोळसकर , सूरज कवडे, वन विभागाचे विकास जोरकर यांनी खोल दरीत जाऊन मुसळधार पाऊस, तसेच जोरदार वारा सुरु असताना बेपत्ता गौतम याचा शोध घेतला. मात्र रात्रीच्या अंधारात तो आढळून न आल्याने रात्री ११ वाजता शोधकार्य थांबवलं. आज सकाळी ६ वाजता पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे. सायंकाळी ४ वाजेपर्यंत गौतमचा शोध लागलेला नाही.

